पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. द्वादशादित्यांचे तेज एकवटावें, त्याप्रमाणे देवाच्या अंगप्रभेचा चमत्कार काय ह्मणून सांगावा ( क. १३२) ? बाहेर दृष्टि उघडून पाहिले असतां ज्याप्रमाणे देवाचे रूप दिसते त्याप्रमाणे आंतही तसेच दिसते. पहात असतांना देवाचे रूप दिसावे यांत नवल काय ? न पाहताही ते दिसते हेच आर्य होय (क्र. १३). दर्पणाच्या आधारे आपले रूप मूर्ख लोक आपण पाहतात तशांतला हा भाग नाही. ज्याप्रमाणे झरा आपल्या उगमामध्येच सांचन रहावा, अगर पाणी आटले असता प्रतिबिंब ज्याप्रमाणे बिंबांतच मिसळून जावें, त्याप्रमाणे वरूपदर्शन आहे. ज्यांनी आपण आपल्यास पाहिले, त्यांनी आपल्या मूळच्या स्थानाचं जयपत्र घेतले असें म्हणण्यास हरकत नाहीं (क. १३५). २३. ज्यांस असा आत्मसाक्षात्कार झाला त्यांची चिन्हें ज्ञानेश्वरीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी फार उत्तम रीतीने वर्णिली आहेत. ज्यांस आत्मसुख प्राप्त झालें त्यांस सहजच विषय सोडवतात हे सांगण्याचे कारण नाही. कुमुददळाच्या ताटावर चंद्रकिरणे जेवणारा चकार वाळवंट चुंबील काय (क्र. १३६)? अशा मनुप्यापुढे ऋद्धिसिद्धी आल्या गेल्या तरी तो महासुखांत निमग्न असल्यामुळे त्यांची त्यास किंमत रहात नाहीं (क्र. १३८). क्षीरसागर मंदराचलाने न घुसमतां आयतें प्राप्त झालेले जे हे परमामृत त्याची केवळ भाषा ऐकूनही संसार वाव होईल; मग त्याचे सेवन केले असतां काय होईल हे सांगण्यासच नको (क्र. १३९). एकासनावर बसून आदराने सद्गुरुस्मरण अनुभवित असतां अंतर्बाह्य सात्त्विक गुणाने भरून जाऊन अहंभावाचे काठिन्य नाहीसे होते व इंद्रियांची कसमस मोडते. मनाची घडी आंतल्या आंत बसते, व बसताक्षणीच अभ्यासाचे फल प्राप्त होते (क्र. १४१) चित्त परतून ज्यावेळी आपण आपल्यास पाहते, व ते तत्त्व मी अशी ज्यावेळेस त्याची खात्री पटते त्यावेळेस सुखाचे साम्राज्य उत्पन्न होते (क.. १४२). अशा पुरुषास पृथ्वीच्या मोलाचे अनय रत्न एखाद्या गारगोटीसारखे वाटावे हे नवल नव्हे (क. १४२). पिकलेली केळी ज्याप्रमाणे उन्मळून पडतात, त्याप्रमाणे आत्मलाभाने अशा पुरुषाच्या क्रिया हळूहळू गळून पडतात. एखाद्या वृक्षास आग लागली असतां ज्याप्रमाणे त्यावरील पक्षी उडून जातात, त्याप्रमाणे अशा मनुष्याच्या मनांतील संशय नाहीसे होतात (क्र. १४६). जिंकणारा व हरणारा या दोघांसही युद्धभूमि ज्याप्रमाणे सारखीच लेखते, त्याप्रमाणे मित्र, अगरः शत्रु हे. .