पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. ठेवण्याजोगा आहे. " पूर्वी ऋषीश्वरांनी जरी देवाचे रूप वर्णिले होते, तथापि ते मला खरे वाटत नव्हते. नारद नेहमी जवळ येऊन भगवंताचे गुण गात असे, तथापि त्याचा अर्थ न समजून आम्ही गीतसुखच ऐकत होतो. अंधळ्याच्या गांवांत रवि उगवला असता त्याचा प्रकाश त्यांस न दिसून केवळ आतपाचाच मात्र त्यांस अनुभव येतो. असितदेवल हे जरी तुझें रूप वर्णीत असत, तथापि माझी बुद्धि त्यावेळी विषयावषाने माखिली होती.आता मात्र तझी रुपा झाल्याने मला सर्व रहस्य कळून आले. माळ्याने झाडांस कितीही पाणी घातले,तथापि वसंत येईपर्यंत त्यांस फलें फळे येत नाहीत" ( क. ११९ ). अर्जनाची जी स्थिति तीच सर्व साधकांची स्थिति असते. तनुमनजीवाने ते संतांच्या चरणांस लागल्यास पुण्योदय होऊन त्यांस श्रीगुरु भेटेल (क्र. १२० ). गुरुकृपालब्धीवांचून आत्नसिद्धि होत नाही (क. १२१). कीर्तनांत मग्न झालेल्या संतांचे माहाम्य वर्णन करता येणे शक्य नाही. ईश्वराच्या नामघोषाने सर्व विश्वाचे दुःख लयास नेऊन सगळे जगच ते आनंदाने भरून टाकतात. कृष्ण विष्णु हरि गोविंद या नामांच्या संकीर्तनाने ते देश व काल यांस विसरून जातात (क्र. १२२ ). उपाय केला असतां ज्याप्रमाणे एखादा पांगळाही पाहडावर चढू शकतो, त्याप्रमाणे सदभ्यास करून परमपुरुषाकडे लक्ष ठेविलें असतां त्याची प्राप्ति होऊ शकते. चित्ताने एकझं आत्म्यास वरिले म्हणजे मग देह असो वा जावो त्याची किंमत रहात नाहीं ( क्र. १२३ ). ज्या ज्या क्षगी म्हणन देवाचे सुख प्राप्त होईल त्या त्या क्षणी तरी निदान विषयाबद्दल अनीति उपजेल. अभ्यासाने विष पचविता येते, आणि व्याघ्र व सर्प हेही ताब्यात घेता येतात. म्हणून अभ्यासास कोणतीच गोष्ट दुष्कर नाहीं ( क्र. १२४). अभ्यासाचे स्थानही मोठं मनोहर अतून तेथे अमृताप्रमाणे सदा फळणारी झाडे असावी. फारसे ऊन अगर फारता वाराही तेथे नसावा. निःशब्द असले म्हणून तेथे श्वापद नसावे. पोपट अथवा भ्रमर तेथें नसावा. एखादे वेळेस हंस, अगर कोकिळ, अगर मयूर आला असतां आमची हरकत नाही ( क्र. १२५). अशा ठिकाणी अभ्यास करून कुंडलिनीचे उत्थान झाल्यावर अनाहताची बोली चाळवू लागते, जणू काही आकाशासच वाचा फुटली आहे असे वाटते ! (क्र. १२६). देवाचें रूप सर्वत्र दिसावयास लागणे हीच ध्यानाची परिसमाप्ति होय. पुढे मागें, खाली वर, सन्मुख विन्मुख ज्याप्रमाणे अर्जुनास देवाचे रूप दिसलें (क्र. १२९), त्याप्रमाणेच सर्व साधकांस दिसावयास पाहिजे. जणू काही देव हातांत दिवटी घेऊन पुढे चालल्याप्रमाणे सर्वत्र लखलखाट होतो! ( क. १३१ ). कल्पांती ज्याप्रमाणे