पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. देणे यासच सात्त्विक क्रिया म्हणावें ( क्र. ९० ). आपण महत्त्वाद्रीच्या शृंगावर चसण्याच्या इच्छेनें, व सर्व विश्वाच्या स्तोत्रास आपण पात्र होण्याच्या इच्छेनें केलेले कर्म राजस कर्म होय ( क्र. ९१). डोक्यावर गुग्गुळ जाळणे, अंगावर निखारे ठेवणे, अधोमुखाने धूम्राचे घांस घेणे, अगर जिवंत असतांनाच मांसाचे तुकडे तोडणे, वगैरे सर्व क्रिया तामस होत (क्र. ९२). या रजतमसत्त्वाच्या पलीकडे जाऊन अद्वयत्वाने ईश्वरास शरण रिघणे यासच अभेदसाक्षात्कार ह्मणतां येईल (क्र. ९३). १९. गीतेतील कर्मयोगाचे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीतही फार उत्तम रीतीने मांडले आहे. सूर्य जसा न चालतां उदयास्तामुळे चालत असल्यासारखा दिसतो, त्याप्रमाणे कमांमध्ये असूनही मनुष्याने नैष्कर्मसिद्धि मिळवावी. ज्यांनी आपल्या जीविताचे ध्येय गाठले, व जे निष्कामतेपर्यंत पोंचले, त्यांस सुद्धा लोकांकरितां कर्मे करावी लागतात. सर्व अंधांच्या पुढे जसा एक डोळस चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांपुढे कर्मयोग्याने स्वतःच्या आचरणाने धर्माचा कित्ता घालून द्यावा (क्र. ६५). ज्या बालकास अद्याप स्तनांतील दूध सुद्धां पितां येत नाही, त्यापुढे पक्वान्ने मांडली असतां ते जसें हास्यास्पद होईल, त्याप्रमाणे ज्यास कमसुद्धा नीट आचरितां येत नाहीत त्यास नैष्कर्म्यतत्त्व सांगणे हेही हास्यास्पदच होणार आहे (क्र. ९६ ). ए-हवीं, नांव परतीरास गेल्यावांचून ती मध्येच सोडणे बरे नव्हे, अगर केळ फळल्यावांचून तिचा त्याग करणे हे उचित नाही, त्या प्रमाणे आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त झाले नाही तोपर्यंत कर्मादिकांवर उदासीन होणे हेही अयोग्यच होय. अतिवेगामळे जशी वेगाभावस्थिति प्राप्त होते त्याप्रमाणे कर्मातिशयाने नष्कासद्धि प्राप्त होते (क्र. ९७ ). आत्मज्ञान प्राप्त करून न घेतां जे दीक्षित यज्ञयागादि कम करतात, ते पुण्याच्या नावाने पापाचीच जोडणी करतात. हे त्यांचे स्वर्गास नेणारे पुण्यात्मक पाप नरकास नेणा-या पापात्मक पापापेक्षा फारसें निराळे नाही. ज्याच्यायोगाने आत्मज्ञान प्राप्त होते अशा शुद्ध पुण्याचा राजमार्ग सोडून हे लोक स्वर्ग व नरक या आडवाटांनी जातात (क्र.९८). कर्मात नष्कयसिद्धि मिळविण्याचे चार उपाय आहेत. (१) आपण जी कम करतो ती स्वधर्मविहित आहेत म्हणून करावीत; वर्णविशेषवशाने जे स्वधर्म सांगितले आहेत त्यांचे आचरण केलें असतां आपोआप सर्व काम पूर्ण होतात ( क्र. ९९ ). (२) सर्व कर्मे करणे ती अहंकाराचा त्याग करून करावीत. जो मनुष्य मोलाने -