पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ ज्ञानेश्वरवचनामृत. नाही. देहपणाने जिवंत राहणे हे त्यास एखाद्या सूपवान् मनुष्यास कुष्ठ लागल्याप्रमाणे प्राणसंकट वाटते. गंगेचे उदक ज्याप्रमाणे सभोवतालचे पापताप फेडीत व तीरीचे पादप पोषीत समुद्रास जातें, अगर सूर्य जसा जगाचे आंध्य फेडीत व व तेजाची भवनें उघडीत विश्वाच्या प्रदक्षिणेस निघतो, त्याप्रमाणे हाही पुढिलांचे सुख उन्नतीस आणण्याकरितां रात्रंदिवस झटत असतो (क्र. ८०). याच्या उलट आसुरीसंपत्तीच्या मनुष्यास मांदुरी लोकांच्या घोड्यांस ज्याप्रमाणे ऐरावतही तुच्छ वाटावा त्याप्रमाणे सर्व जग तुच्छ वाटते. अभिमानाच्या मोहाने ईश्वराचें नामही यास सहन होत नाही. पुढिलांची विद्या, वैभव, व संपत्ति पाहून याचा क्रोध दुणावतो. त्याचे मन जणू काही सर्पाचे वारूळच असते. त्याची दृष्टि म्हणजे जणू काही बाणांची सुटीच होय. त्याचे बोल हे इंगळांच्या वृष्टिप्रमाणे तीक्ष्ण असतात. ज्याप्रमाणे एकाच राशीला एकावेळी सर्व क्रूर ग्रहांची मांदी मिळावी, अगर एखाद्या मरणान्या मनुष्याच्या अंगांत सर्व रोगांनी एकदम प्रवेश करावा, अगर एखाद्या प्राण सोडीत असलेल्या शेळीस एकदम सात नांग्यांच्या इंगळीने दंश करावा, त्याप्रमाणे अशा आसुरी संपत्तीच्या मनुष्यांत सर्व दोष एकदम अवतरतात. मोक्षमार्गाच्या बाजूस यांस आवरण पडल्याने हा उत्तरोत्तर अधमाधम योनींप्रत जातो (क. ८१). १८. गीतेच्या १७ व्या अध्यायांत ज्ञान अज्ञानाचे लक्षण करतांना व तसेच १६ व्या अन्यायांत देवासुरसंपत्तीचा विचार करतांना जी नीतिमीमांसा ज्ञानेश्वरांनी केली आहे, त्यावांचून अन्यत्रही निरनिराळ्या अध्यायांत थोडीबहुत नीतिमीमांसा सांपडते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्याच बुद्धीस सद्बद्धि म्हणावें, की जिची परिसमाप्ति परमात्म्याच्या प्राप्तीत होते (क्र. ८२). ज्याने आपले अंत:करण जिंकलें, व ज्याचें सकळ काम शांत झाले, त्यास परमात्मा दूर नाही (क्र.८४). साधकाने आपल्या सर्व कृतीमध्ये परिमितता बाळगली पाहिजे (क्र. ८५). जो आपल्या मुळाशी पाणी घालतो, अगर जो तोडण्यास घाव घालतो, त्या दोघांसही वृक्ष जशी सारखीच साउली देतो; अगर इक्षुदंड ज्याप्रमाणे पाळणान्यास गोड व गाळणा-यास कड असा होत नाही, त्याप्रमाणेच साधकानें रिपुमित्रांमध्ये सारखाचे भाव धरावा (क्र. ८६ ). साधकाने सर्वतीर्थापेक्षा श्रेष्ठ अशी जी मातापितरें त्यांची एकभावान सेवा करावी. फक्त एकदां जन्मतांनांच तेवढा स्त्रीच्या अंगाचा स्पर्श झाला असेल तो असो, पण तेथून पढें जन्मभर शरीर सोवळे राखावें (क.८८). तळहातावर ज्याप्रमाणे रोम उगवत नाहीत, त्याप्रमाणे मनांतही दुष्ट भाव उगवू न