पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. देवाचे भजन करावे त्याप्रमाणे एकाग्रचित्तानें तो स्त्रीची उपासना करतो. एखाद्या कुणबटाप्रमाणे हा नवेनवे देव मांडतो, व ज्याचा मोठेपणा त्याच्या नजरेस येतो अशा गुरूचा हा उपदेश घेतो. माझी मूर्ति निपजवून ती घराच्या एका कानाकोपन्यांत बसवितो, व आपण देवोदेवींच्या यात्रेस निघून जातो. माझें नित्य आराधन असले तरी एखाद्या विशेष कार्याचे दिवशी याने कुळदेवतेचे भजन केलेच ! एखाद्या गांवांत जशी वेश्या असावी, त्याप्रमाणेच याचे चित्त या देवावरून त्या देवावर, व त्या देवावरून या देवावर जाते. उपनिषदांकडे याचे लक्ष असत नाही. योगशास्त्र यास रुचत नाही. अध्यात्मज्ञानाकडे याचे चित्तच नसते. मोराच्या अंगावर पुष्कळ डोळस पिसे असावी, पण त्यांस दृष्टिमात्र नसावी, त्याप्रमाणे हा कितीही शास्त्रं पढिन्नला तरी त्यास अध्यात्मज्ञान मात्र नसते (क्र. ७९ ). १७. गीतेच्या सोळाव्या अध्यायांत देवीसंपत्तीचे व आसुरीसंपत्तीचे जे वर्णन केले आहे त्यास अनुसरून ज्ञानेश्वरांनीही या विषयांची चर्चा आपल्या टीकेंत फार सुंदर रीतीने केली आहे. जो देवीसंपत्तीमध्ये निर्माण होतो त्यास सर्वत्र आत्माच दिसत असल्याने त्याची ऐक्यबुद्धि होऊन त्यास भय कसे ते उरत नाही. आपला वल्लभ गांवास गेला असता एखाद्या पतिव्रतेस विरहक्षोभ होऊन तिला लाभालाभ जसे दिसत नाहीत, त्याप्रमाणे सत्स्वरूपाकडे याची दृष्टि असल्याने त्यास सुखदुःखाचे कारण रहात नाही. धूपाने अग्निप्रवेश करून ज्याप्रमाणे नाहींसें व्हावें, अगर चंद्राने पितृपक्ष पोशीत असतां आपला हास करून घ्यावा, त्याप्रमाणे स्वरूपसाक्षात्काराकरितां देवीसंपत्तीचा मनुष्य आपल्या प्राणेंद्रियशरीराची आटणी करितो. ज्याप्रमाणे सापाच्या त्वचेस पायाने लाथाडिलें असतांही ती आपली फणा . वर उचलीत नाही, त्याप्रमाणे अशा मनुष्यास लोकांची वाईट कृत्ये पाहूनही कोध येत नाही. एखादी व्याधि जिंकण्याकरिता सद्वैद्य जसा आपपर पहात नाही, एखादा मनुण्य बुडत असतां तो अंत्यज आहे किंवा ब्राह्मण आहे याचा जसा कोणी विचार करीत नाही, एखाद्या माउलीस पापी पुरुषाने उघडी केली असतां तिला नेसविल्यावांचून जसा कोणी राहत नाही, त्याप्रमाणे असा मनुष्य कारुण्यपूर्ण दृष्टीने सर्वत्र पाहतो. एकंदरीत दुःखितांच्या दुःखाचा वांटेकरी होण्याविषयीच याचा जन्म असतो. सूर्याच्या मागोमाग कमळ उमलले असतां तो जसा त्याच्या सौरभ्यास शिवत नाही, त्याप्रमाणे आपल्यास अनुसरणाऱ्या लोकांकडे हा विषयदृष्टीने पहात