पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. १९ जशी क्षमा करतो, अगर सख्याचे उद्धृत वर्तन जसा सखा निवांतरीतीने साहतो, त्याप्रमाणे देवाने आपल्यास क्षमा करावी ह्मणून अर्जुनाने ईश्वराचे अपराधक्षमापनस्तोत्र केलें ( क्र. ५३ ). विश्वरूपास अर्जुनाचे धसाळपण पाहून मोठा विस्मय वाटला; जें आपलें अपरंपार रूप की जेथून कृष्णादिक अवतार निर्माण झाले त्याची अर्जुनास भीति वाटावी हे पाहून त्यास थोडाबहुत कोपही आला; अमृताच्या समुद्रांत बुडलों असतां मरेन ह्मणून ज्याप्रमाणे एखाद्याने वर येण्याची धडपड करावी. अगर सोन्याचा इतका मोठा डोंगर घेऊन काय करावयाचा ह्मणून त्याचा जसा अव्हेर करावा, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपाचा अव्हेर केला (क्र. ५४). तथापि भकाची इच्छा प्रबळ म्हणून विश्वरूपाने पुनः कृष्णरूप घेऊन अर्जुनाचे सांत्वन केलें. विश्वरूपपटाची घडी त्याने अर्जुनाकरितां उकलून दाखविली होती ती गिन्हाइकी होत नाही म्हणून त्याने पुनः मिटली. इतक्या ठावपर्यंत शिण्याचे वर्तन सहन करणारे गुरु कोणत्या देशांत आहेत असें ज्ञानेश्वर विचारतात ?( क्र. ५५ ). असो १४. एकंदरीत स्वरूप असो, अगर विश्वरूप असो, ज्याच्या त्याच्या भावने, प्रमाणे ज्याने त्याने ते आपल्या कृतनिश्चयाचें घर केले पाहिजे. ब्रम्हस्वरूपासच विश्वबाहु, विश्वांघ्नि, विश्वतश्या, विश्वमर्धा, विश्वतोमुख अशा संज्ञा आहेत. शून्य काय आहे हे दाखविण्याकरितां ज्या प्रमाणे वर्तुळ काढावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत सांगावयाचे झाले तर ते द्वैताच्या भाषेत बोलल्यावांचून गत्यंतर नाही. एकंदरीत ईश्वराचे स्वरूप अनिर्वर्णनीय आहे हे खास (क्र. ५९ ). या स्वरूपासच चित्सूर्याची उपमा देऊन ज्ञानेश्वरांनी सोळाव्या अव्यायाच्या प्रारंभी त्याचे मोठ्या बहारीने वर्णन केले आहे. या चित्सूर्याचा चमत्कार असा की जो उगवला असतां सर्व जग मावळून जाते; ज्याच्या प्रकाशापुढे ज्ञानाज्ञानचांदण्या लोप पावतात; ज्याच्यामुळे जीवपक्षी आपल्या अहंकाराची घरी सोडून बाहेर येतात, लिंगदेहकमळाच्या पोटांत नाश पावत असणा-या चिदराचा बंदिमोक्ष होतो, व भेदनदीच्या दोन्ही तीरांवर विरहवेडी होऊन आरडत असणाऱ्या बुद्धिबोधरूपी चक्रवाकांचा संयोग होतो; ज्याच्या तेजांत उन्मेषरूपी सूर्यकांताच्या ठिणग्या पडल्यामुळे संसाराची दांगें भस्म होतात; व जो सोहंतेच्या माध्यान्ही आल्यावर आत्मभ्रांतिरूप छाया आपल्या पादतळांतच नाहीशी होते; अशा अहोरात्रांच्या पलीकडे असलेल्या ज्ञानमार्तंडाचे दर्शन घेण्याचे भाग्य कोणास लाभले आहे असे ज्ञानेश्वर विचारतात ? (क. ६० ). - .