पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. यांचा संबंध वन्हि व ज्वाळा याप्रमाणे आहे; माणिक व माणिकाचें तेज ही जशी दोन नाहीत, त्याप्रमाणे ईश्वर व जगत् ही भिन्न नाहीत (क्र. ४३). अशा ईश्वराचे याथातथ्य रीतीने ज्ञान प्राप्त होणे ही फार कठीण गोष्ट आहे. उदरांतील. गर्भास ज्याप्रमाणे मातेचे वय कळत नाही, मशकास ज्याप्रमाणे गगन ओलांडवत नाही, पर्वतावरून खाली आलेल्या उदकास ज्याप्रमाणे वर चढवत नाही, त्याप्रमाणे मजपासून उत्पन्न बालेल्या जगास माझें स्वरूप कळणे अशक्य आहे (क्र. ४).. येथें ज्यास जाणीव प्राप्त झाली, त्यास नेणिवेने ग्रासले, व जो नेणिवेत तृप्त झाला त्यास जाणीव उत्पन्न झाली असा चमत्कार होतो. आपला शरीरभाव सोडल्यावांचन, सर्व गुणांचे लोण उतरल्यावांचून, सर्व संपत्तीची कुरवंडी केल्यावांचून, देवाचे स्वरूप कळणे शक्य नाहीं (क्र. १५). ईश्वराच्या विभूतींच्या विस्तारांत मन न घालितां ईश्वराचे एक स्वरूप जाणले म्हणजे पुरें; सर्व नक्षत्रे वेंचावी अशी इच्छा झाल्यास ज्याप्रमाणे गगनाची मोट बांधली असतां कार्य होईल, अगर पृथ्वीतील परमाणूंचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास ज्याप्रमाणे भूगोलच काखेत घेतल्यास पुरे, त्याप्रमाणे सर्व विभूतिविशेष पाहणे झाल्यास ईश्वराचे एक स्वरूप पाहिले म्हणजे झाले ( क्र. ४८). १३. हे विश्वरूप काय आहे हे पाहण्याबद्दलची अर्जुनाची अत्यंत उत्कंठा गीता व ज्ञानेश्वरी यांच्या अकराव्या अध्यायांत वर्णिली आहे. हे विश्वरूप बाहेर लोचनास गोचर व्हावे ह्मणून अर्जुनानें श्रीकृष्णांस अंतरीचे गुज दाखविण्याविषयी प्रश्न केला (क्र. ९). ज्या ठायास ईश्वराचे मुद्दलरूप ह्मणतां येईल, जेथून ही द्विभुज व चतुर्भुजरूपें प्रकट होतात, ज्याचे गायन उपनिषदें करितात, जे रूप सनकादिक पोटाळून राहतात, ते अगाध रूप दृष्टीस गोचर व्हावे अशी अर्जुनाने इच्छा दर्शविली ( क्र. ५०). परंतु ते रूप दिव्यदृष्टीवांचून दिसणे अशक्य असल्याने श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनास दिव्यदृष्टि दिली; दिव्यदृष्टि प्राप्त झाल्यावर अर्जुन चमत्काराच्या अर्णवांत बुडून गेला; प्रथम तो जे स्वरूप पाहत होता त्याचेच आतां विश्वरूप बनले ( क्र. ५२ ). परंतु तें विश्वरूप इतकें " घोर, विरुत, आणि थोर" होते की न पाहिलेलें रूप आपण आता पाहिले ह्मणून अर्जुनास जरी आनंद झाला, तथापि जे पाहिले ते इतकें भयंकर होते की त्यामुळे अर्जुन गर्भगळितच होऊन गेला; व तें रूप पाहण्याचे सामर्थ्य अंगी नसल्याने त्याने ईश्वरास आपले मूळचेंच रूप दाखीव अशी प्रार्थना केली. पुत्राचे सहस्र अपराध झाले तरी पिता त्यास (