पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९६ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१७४ शिष्यशाखादिविलासें । मठादिमुद्रचेनि मिसे। घातले आहाती फांसे । निःसंगा येणे ॥ घरी कुटुंबपणे सरे । तरि वनीं वन्य होऊनि अवतरे। नागवियां ही शरीरें । लागला आहे ॥ ऐसा दुर्जयो जो परिग्रहो। तयाचा फेडूनि ठावो। भवविजयाचा उत्साहो । भोगितसे तो॥ तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणांचे जे मेळावे। ते कैवल्यदेशीचे आववे । रोवो जैसे आले ॥ तेव्हां सम्यक्ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया। परिवारु होऊनियां । राहत आंगे ॥ प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं। कीजत आहे प्रतिपदी । सुखाचे लोण ॥ .. पुढां बोधाचिये कांविरी । विवेक दृश्याची मादी सारी। योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥ तेथ ऋद्धिसिद्धीची अनेगें । वृंदे मिळती प्रसंगे। तिये पुष्पवर्षी अंगें । नाहतसे तो॥ ऐसेनि ब्रह्मैक्यासरिसे। स्वराज्य येतां जवळिके। झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥ तेव्हां वैरिया कां मैत्रिया । तयासि माझे म्हणावया। समानता धनंजया । उरेचिही ना ॥ है ना भलेतेणे व्याजे । तो जयाते म्हणे माझे। ते नोडवेचि कां दुजे । अद्वितीय जाला ॥ ज्ञा. १८. १०४७-१०७४. ..१ चिन्ह. २ निःसंगमनुष्याप्रत. ३ मांडलिक. ४ राज्य. ५ अर्पून. ६ राजमार्ग. ७ जाग्रत् स्वप्न सुषुत्यादि सुंदर स्त्रिया. ८ निंबलोण. ९ सोन्याची काही १. विवेकरूपी चोपदार. ११ गर्दी. १२ जणूकाहीं. १३ समुदाव. १४ उचंबळणे. १५ हर्षाने. १६ प्राप्त होत नाही, सांपडत नाही.