पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१६९] साक्षात्कार. अथवा पितरांची व्रते। वाहातीं जयांची चित्ते। जीवित सरलिया तयांत । पितृत्व वरी॥ कां क्षुद्रदेवतादि भूते। तियेचि ज्यांची परम दैवते। जिहीं अभिचारिकी तयांत । उपासिले॥ तयां देहाची जवनिका फिटली। आणि भूतत्वाची प्राप्ति जाहली। एवं संकल्पवशे फळली। कमै तया॥ मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानी मीचि ऐकिला। मीचि मनीं भाविला । वानिला वाचा॥ सर्वागी सर्वा ठायीं। मीचि नमस्कारिला जिहीं। दानपुण्यादिके जे कांहीं । ते माझियाचि मोहरां॥ जिहीं मातेचि अध्ययन केले। जे आंतबाहरी मियांचि धाले। जयांचं जीवित्व जोडले । मजचिलागीं॥ जे अहंकार वाहत अंगीं। आम्ही हरीचे भूषावयालागीं। जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभे ॥ जे माझेनि कामे सकाम । जे माझेनि प्रेम सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम नेणती लोक ॥ जयांची जाणती मजचि शास्त्रे । मी जोर्ड जयांचेनि मंत्र। . ऐसे जे चेष्टामात्रै । भजले मज ॥ ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणी आणिकीकडे। जातील कोविं॥ म्हणोनि मद्याँजी जे जाहले । ते माझिया सायुज्या आले। जिहीं उपचारमिषे दिधले । आपण मज ॥ ज्ञा.९. ३६५-३६६. जारणमारण कर्म करणाऱ्यांनी. २ पडदा. ३.कल्पना केली. ४ उद्देशाने. ५ अलीकडे. ६ निश्चयेंकरून. ७ माझे भजन करणारे. ८ सेवेच्या निमित्ताने.