पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६ १६७ हे असो मग म्हणितले । जे कां तुज सांगितले। तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥ परि जाणोनियां मात । जे पाहों विसरले माघौते । जैसे सागरा येऊनि सरिते । मुरडावे ठेलें ॥ तैसी अंतःकरणकुहरी जन्मली। जयाचीप्रतीतिगंगा मज मीनली। तो मी हे काय बोलीं। फार करूं॥ येहवीं शानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझे । हे न म्हणावें परि काय कीजे । न बोलणे बोलों ॥ ज्ञा. ७. ११४-१२६. १६८. जीवन्मुक्तावस्था. आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं। म्हणऊनि अव्हेर करितां कांहीं । वियोग ऐसा न वाटे॥ ना तरी देहांतींचि मियां यावे । मग आपण यात न्यावे । हेही नाही जे स्वभावें । आधींचि मज मिनले ॥ येरी शरीराचिया सलिली । असतेपण हेचि साउली। वांचुनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ॥ ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांती निश्चित । मीचि होती ॥ ज्ञा. ८. १३६-१३९. १६९. " ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे." मने वाचा करणीं । जयांचिया भजनी देवांचिया वाहाणी। ते शरीर जातियेक्षणीं । देवचि जाले ॥ 1 मागें, २ माघारे उलटणे. ३ राहिले. ४ गुहेत. ५. तादात्म्याचा. ६ पत्ता. .. येहवी. ८ इंद्रियें. ९ इंद्रादिकदेवांच्या. १० मार्ग. .