पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૧૮૮ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१६४ देहवैकल्याचा वारा । झणे लागेल या सकुमारा। म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरां । सुये तयाते ॥ वरि आपुलिया स्मरणाची उवायिली । हींव ऐसी करी साउली। ऐसनि नित्यबुद्धि संचली। मी आणी तयाते ॥ म्हणोनि देहांतीचे सांकडे । माझियां कहींचि न घडे। मी आपुलियांत आपुलीकडे । सुखेचि आणीं ॥ ज्ञा. ८. १२० - १३४. १ १६५. साधु देह कसा ठेवतो ? तया अव्यंगाणेया ब्रह्माते । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्ते । जाणोनि स्मरे ॥ बाहेर पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनी । कर्मयोगाचें ॥ आंतु मिनलेनि मनोधर्मे । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें। आपेआप संभ्रमें । मिळावया ॥...॥ परी मनाचेनि स्थैर्य धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळे आवरला। सज्ज होउनी॥ तो जडाजडाते विरवितु । भ्रूलतांमाजी संचरतु। जैसा घंटानाद लयस्थु । घंटेसींच होय ॥ कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीतीं जो पांडवा । देह ठेवी ॥ तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसे नाम । ते माझे निजधाम । होऊनि ठाके॥ ज्ञा. ८.९१-९९.

  • १ देहदुःखाचा. २ पिंजऱ्यात. ३ प्रशस्त. ४ गार. ५ देतो...६ पूर्ण७ एकवटलेल्या. ८ लीन करतो. ९ भृकुटीमध्ये.