पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ ज्ञानेश्वरवचनामृत. 1$१५८ आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकै ते माउलीसचि करणे। तैसे अनुसरले मज प्राणे । तयांचे सर्व मी करी।। तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेचि पुरवी कोड। का सेवा म्हणती तरि आड । प्रेम सुये ॥ ऐसा मनी धरिती जो जो भावो । तो पुढांपुढां लागे तया देवो। आणि दिधलियाचा निर्वाहो । तोही मीचि करी॥ हा योगक्षम आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा। जयांचिया सर्वभावा। आश्रय मी॥. ज्ञा.९.३३५-३४३, - १५९, "काय समर्थाची कांता । कोरान्न मागे?" . कर्मेंद्रिये सुखें । करिती कमैं अशेखें । जिये कां वर्णविशेख । भागा आलीं॥ विधीत पाळित । निषेधात गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळे ॥ ययापरी पाहीं । अर्जुना माझे ठायीं। संन्यसूनि नाहीं। करिती कमै ॥ आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं॥ ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषे घर । माझे झाले। जयांचिये आवडी । केली मजसी कुळवाडी। मोगमोक्ष बापुडी । त्यजिली कुळे ॥ ऐसे अनन्ययोगे । विकले जीवे मने आंगे। तयांचे कायि एक सांगे। जे सर्व मी करी ॥...॥ १ घालतो, २ हेतु. ३ व्यवस्था. ४ योग=अप्रात्पाची प्राप्ति, क्षेमप्राप्ताचे संरक्षण. ५ अर्पण करून. ६ नाहीशी. ७ अन्य, दुसरी. ८ व्यवहार. ९ दीन. .