पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६१५२ १७६ ज्ञानेश्वरवचनामृत. आणि तेचि समयीं। सदरु भेटले पाहीं। तेवींचि तिहीं कांहीं। वंचिजेना ॥ परि वोखद घेतखेवो । काय लाभे आपला ठावो। का उदयजतांची दिवो। माध्यान्ह होय ॥ सुक्षेत्री आणि वोलटे। बीजही पेरिले गोमटे। तरि अलोट फळ भेटे । परि वेळे की गा॥ जोडला मार्ग प्रांजळ । मिनला सुसंगाचाही मेळ । तरि पाविजे वांचूनि वेळ । लागेचि की। तसा वैराग्यलाभ जाला। वरि सद्गुरुही भेटला। जीवीं अंकुर फुटला । विवेकाचा ॥ तेणे ब्रह्म एक आथी। येर आघवीची भ्रांति। हेही कीर प्रतीती। गाढ केली॥ परि तेचि जे परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेही काम । सरे जेथ ॥ यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जे गा किरिटी। तया ज्ञानासही मिठी । दे जे वस्तु ॥ ऐक्याचे एकपण सरे । जेथ आनंदकण ही विरे। कांहींचि नुरोनि उरे । जे कांहीं गा॥ तिये ब्रह्मीं ऐक्यपणे । ब्रह्मचि होऊनि असणे । ते क्रमेचि करूनि तेणें । पाविजे पैं॥ भुकेलियापासीं। वोगॅरिले षडसीं। तो तृप्ति प्रतिग्रासी। लाहे जेवीं॥ तैसा वैराग्याचा ओलावा । विवेकाचा तो दिवा। आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो॥ तरि भोगिजे आत्मऋद्धि । येवढी योग्यतेची सिद्धि । जयाच्या आंगीं निरवधि । लेणे जाली॥ १ फसवले नाही. २ औषध. ३ ओल्या जमीनींत. ४ अत्यंत. ५ सरळ, सोपा. ६ दृढ. ७ वाढलें. ८ उजळला असतां. ९ अत्यंत.