पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ झानेश्वरवचनामृत. [६१४८ उदयलेनि सुधाकरें। जैसा भरलाचि समुद्र भरे। तैसा वेळोवेळी ऊर्मिभरें। उचंबळत असे॥ ऐसा सात्विकांही आठां भावां । परस्पर वर्ततसे हेवा। तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली॥ तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिकडे मस्तक खालविला देवा। मग जोडूनि करसंपुट बरवा । बोलत असे॥ ज्ञा. ११. २४५-२५४. १४९. " अंतरात्मयाही निश्चला । आली शियारी. देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलो प्रतिफळे । बापा देखिलासी आतां डोळे । निवावे तैसे निवाले॥ अहो देह पार्थिव कीर जाये। ययाची काकुळती कवणा आहे। परि आतां चैतन्य माझे विपाये । वाचेल की न वांचे॥ येहवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळे तरि मन तापे। अथवा बुद्धी वांसिपे । अभिमान विसरिजे॥ परि येतुलियाही वेगळा। जो केवळ आनंदैककळा। तया अंतरात्मयाही निश्चळा । आली शियारी॥ बाप साक्षात्काचा वेध। कैसा देशभंडी केला बोध । हा गुरुशिष्यसंबंध । विपायें नांदें ॥ ज्ञा. ११. ३६६-३७० १५०. स्वरूपानंदांत द्वैतभाषेचा आत्यंतिक लोप. परि ते वेगळेपणे भोगिजे । जैसे पक्षिये फळ चुंबिजे"। तैसे नव्हे, तेथ विसरिजे । भोगितेपणही॥ १. चंद्र. २ राज्य, ३ ज्या बाजूस. ४ उत्कट इच्छा. ५ मातीचा. ६ भिते. ७ कांटा, कंप. ८ छंद. ९ देशपार. १० क्वचित्च. ११ सेवावें...