पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१४७] साक्षात्कार. १७१ तरि पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा । रत्नी किळावो जैसा। रत्नचि तो॥ का द्रवपणाच नीर । अवकाशचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाहीं॥ वह्नी तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेचि डाळ | फळादिक॥ अगा हिम जै आकर्षले । तेचि हिमवंत जेविं जाले । नाना दूध मुराले । तेचि दही ॥ तैसे विश्व येणे नांवे । हे मीचि पैं आघवे । घेई चंद्रबिंब सोलावे । न लगे जेवी॥ घृताचे थिजलेपण । न मोडितां घृतचि जाण । का नाटितां कांकण । सोनेचि ते ॥ न उकलितां पट । तंतूचि असे स्पष्ट । न विरवितां घट । मृत्तिका जेवीं ॥ म्हणोनि विश्वपण जावें । मग माते घेयावे । तैसा नव्हे आघवे । सकटचि भी ॥ ऐसेनि माते जाणिजे । ते अव्यभिचारी भाक्त म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरि व्यभिचार तो॥ ज्ञा. १४. ३७१-३८१. . याकारणे भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें। आपणयासकट माते । जाणावे गा॥ पार्थो सोनयाची टिक। सोन्यासी लागली देख । तैसे आपण आणिक । मानावे ना ॥ तेजाचा तेजौनि निघाला । परि तेजींचि असे लागला। तया रश्मी ऐसा भला । बोध होआवा ॥ १ कांति, तेज. २ पांकळी. ३ फांदी. ४ थंडी. ५ घट्ट झाली. ६ सोन्याचे कडे. ७ टिकली.