पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"६१४७] साक्षात्कार. कां शरीरा आंतील प्राणु। घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु। ना ना चोहटांचा स्थाणु । उदास जैसा ॥ आणि गुणांचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा। मृगजळाचा हेलांवां । मेरु जैसा ॥...॥ परि तयाचि गा सत्ता। होती गुणक्रिया समस्ता। हे फुडे जाणे सविता । लौकिका जेवीं॥ समुद्रचि भरती। सोमकांत द्रवती। कुमुद विकासती। चंद्र तो उगा ॥ कां वाराचि वाजे विझे । गगने निश्चळ आसिजे । तैसा गुणांचिये गजबजे । डोलेना जो ॥ अर्जुना येणे लक्षणे । तो गुणातीत जाणणे। परिसे आतां आचरणे । तयाची जी॥ '... ज्ञा. १४. ३ १९-३४८, तरि वस्त्रासि पाठी पोटीं । नाहीं सुतावांचुनि किरीटी। ऐसे सुये दिठी । चराचर मद्रूपं ॥ म्हणोनि सुखदुःखासरिसे। कांटोळे आचरे ऐसे। रिपुभक्तां जैसे । हरीचे देणे ॥ येरवीं तरी सहजे । सुखदुःख तचि सेविजे । देहजळी होइजे । मासोळी जै॥ आतां ते तंव तेणे सांडिले । आहे स्वरूपेसींचि मांडिलें। सस्यांतीं निवडिले । बीज जैसे ॥ कां वोघ सांडूनि गंगा । रिघोनि समुद्राचे अंगा। निस्तरली लगबंगा। खळाळाची॥ तेवीं आपणपांचि जया। वस्ती जाली गा धनंजया। तया देहीं आपैसया । सुख तैसे दुःख ॥ . . १. खांब. २ येण्याजाण्यानें. ३ हेलाव्याने. ४ उगा राहतो... ५ ऐक. ६ घालतो. ७ तराजू, तुलना. ८ पलीकडे गेली. ९ त्वरा..