पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ .. . ज्ञानेश्वरवचनामृत. [$१४६ तैसे आत्मभ्रांतीसाठीं। वस्तु विखुरली बारा वाटीं। ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥ किंबहुना आत्मयाचा । निर्धारी विवेक जयाचा। बुडाला वोघ गंगेचा। सिंधुमाजि जैसा ॥...॥ जैसा अग्रीचा डोगर । नेघे कोणी बीज अंकुर। तैसा मनी जयांच्या विकार । उदयजेना ॥ जैसा काढिलिया मंदराचळ । राहे क्षीराब्धि निश्चळ । तैसा नुठी जयां सळे । कामोर्मीचा ॥ चंद्रमा केळीं धाला । न दिसे कोणे आंगीं वोसावला । तेविं अपेक्षेचा अवखेळा । न पडे जयां ॥...॥ एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाख्यहुताशे। ते तेथ मिळती जैसें । हेमी हेम ॥ ज्ञा. १५. २८४-३०५. १४७. त्रिगुणातीताचा अभेदभाक्तियोग. यया देवाचिया बोला । पार्थ अति सुखावला । मेघे संबोचिला। मयूर जैसा॥ तेणे तोषे वीर पुसे । जी कोण्ही चिन्हीं तो दिसे । जयामाजि वसे । ऐसा बोध ॥...॥ यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा । परिहार आकर्णा । बोलत असे ॥...॥ सायंप्रातमध्यान्हा । या तिहीं काळांची गणना। .. नाही जेविं तपना । तैसा असे ॥...॥ ता जिणता ना हारवी । तैसा गुण नव्हे ना करवी। जैसी कां श्रोणवी । संग्रामींची॥ १ पसरली. २ उसळी, कढ. ३ कलांना. ४ न्यून असलेला. ५ न्यूनता. ६ सोन्यांत. ७ तृप्त केलेला. ८ उत्तर. ९ ऐका. १० सूर्याला. ११ जिंकणारा. - १२ हरणारा. १३ युद्धभूमी...... .. .