पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १४६ ] साक्षात्कार. १६७ १४५. स्थितप्रज्ञस्थिति. जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्ण चंद्र कां जैसी।। अधमोत्तम प्रकाशा- माजि न म्हणे ॥ ऐसी अनवैच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयंता। आणि पालट नाही चित्ता। कवणे वेळे ॥ गोमटे कांहीं पावे । तरी संतोषे तेणे नाभिभवे। जो ओखटेनि नागवे । विषादासी॥ ऐसा हरिखशोकरहित । जो आत्मबोधभरित । तो जाण पां प्रशोयुक्त । धनुर्धरा ॥ ज्ञा. २. २९७-३००. . १४६. साधूंची नीतिलक्षणे. परि तया भेटती ऐसे । जे ज्ञाने सर्वत्र सरिसे । महा!ळयांबूचे जैसे । भरलेपण ॥ जया पुरुषांचे कां मन । सांडोनि गेले मोह मान । वर्षातीं जैसे घन । आकाशात ॥...॥ फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभ प्रबळे। जयाची क्रिया ढाळेढोळे । गळती आहे ॥ आगी लागलिया रुखी । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिले अशेखीं । विकल्पी जे ॥...॥ लोहाचे सांकडे परिसा । न जोडे आंधार रवी जैसा। द्वैतबुद्धीचा तैसा । दुकाळ सदा जयां:॥...॥ आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचे क्षीर। चरताति जे सविचार । राजहंस ॥...॥ . १ अविभक्त. २ व्याप्त होत नाही. ३ वाईटार्ने. ४ स्वाधीन होत नाही. ५ स्थितप्रज्ञ. ६ सारखे. ७ महाप्रलयकालच्या पाण्याचे. ८ वर्षाऋतुच्या शेवटी. ९ ढग.१० उन्मळून पढते. ११ क्रमाक्रमाने. १२ वृक्षाला. १३ संकट. -