पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ ज्ञानेश्वरवचनामृत. [$ १४३ तैसे सामान्यत्वे पाहिजे । तरि साधारणचि देखिजे। येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची॥ ऐशा चिन्हीं चिन्हित । देखसी तोचि मुक्त। आशापाशरहित । वोळख पां॥ ज्ञा, ३. ६८-७४. तचिमुक्ता १४४. “ शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडे तुकै." ऐसा शरीरीचि परी कौतुकें । ब्रह्माचेनि पाडे तुके। जेणे जिंतली एके । इंद्रिये गा ॥...॥ देखे सोनयाचे निखळ । मेरुयेसण ढिसाळ । आणि मातियेचे डिखळ । की सरसेचि मानी॥ पाहतां पृथ्वीचे मोल थोडे । ऐसे अनय रत्न चोखडे।। देखे दगडाचेनि पाडे । निचाड ऐसा ॥...॥ तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवण तयाचा। मीचि विश्व ऐसा जयाचा । बोध जाहला ॥...॥ जयाचे नांव तीर्थरावो । दर्शने प्रशतासि ठावो। . जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासही॥ जयाचेनि बोलें धर्म जिये । दिठी महासिद्धीते विये। देखें स्वर्गसुखादि इये । खेळ जयाचा ॥ विपाये जरी आठविला चित्ता । तरी दे आपुली योग्यता। हैं असो तया प्रशंसितां । लाभ आथि ॥ ज्ञा. ६. ९०-१०४. IA . १ स्वरूप, स्थिति, २ तुलनेस येतो. ३ शुद्ध. ४ प्रचंड, ५ ढेकूळ. ६ अमोल. ७ पूज्यतेला. ८ कदाचित्.