पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१४३] साक्षात्कार. पाहे पां आयुष्यात अढळ करी।जे सरते जीवित वारी। तया औषधात वैरी । काय जिव्हा न म्हणे॥ ऐसे हितासी जे जे निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखे। येन्हवीं सोपे योगासारिखे । कांही आहे ॥ म्हणोनि आसनाचिया गाढिका । जो आम्ही अभ्यासू सांगितला निका। तेणे होईल तरि हो कां। निरोध ययां॥ येहवीं तरी येणे योगें । 5 इंद्रियां विंदाण लागे। तै चित्त भेटों रिगें । आपणपेयां ॥ परतोनि पाठिमोरे ठाके । आणि आपणियाते आपण देखे। देखतखेवो वोळखे । म्हणे तत्त्व हे मी॥ तिये वोळखीचिसरिसे । सुखाचिया साम्राज्यीं बैसे। मग आपणपां समरसे। विरोनि जाय ॥ ज्ञा. ६. ३६०-३६७. -- १४३. साधूची पद्मपत्राप्रमाणे अलिप्तता. जो अंतरीं दृढ । परमात्मरूपी गूढ । बाह्य तरी रूंढ । लौकिकु जैसा ॥ तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी। प्राप्त कर्स नाव्हेरी । उचित जे जे ॥ तो कर्मेंद्रिये कर्मी । राहाटतां तरी न नियमी। परि तेथिचेनि ऊर्मी। झांकोळेना ॥ तो कामनामात्रे न घेपे"। मोहमळे न लिंपे। जैसे जळी जळे न शिंपे । पद्मपत्र ॥ तैसा संसर्गामाजी असे । सकळासारिखा दिसे। जैसे तोय संगे आभासे । भानुबिंब ॥ .. - १ स्थिर. २ दृढपणानें. ३ वेध, निग्रह. ४ अंतर्मुख. ५ बरोबर. ६ गुंग, -गढलेला. ७ आचरण करणारा. ८ न टाकी. ९ वेगाने. १० विकार पावत नाही. ११ आकळला जात नाही. १२ संसारांत... ..