पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१३८ जो आपुलेनि नागरपणे । इंद्रभुवनाते पाबळे म्हणे। तो केवि रंजे पालवणे । भिल्लाचेनि ॥ जो अमृताते ठी ठेवी। तो कांजी जैसा न सेवी। तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ पार्था नवल हे पाहीं। जेथ स्वर्गसुखा लेखणी नाहीं। तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती॥ ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदें पोखला। तोचि स्थितप्रज्ञ मला। वोळख तूं॥ तो अहंकारात दवडुनी । सकळ काम सांडुनी। विचरे विश्व होउनी । विश्वामाजी॥ ज्ञा. २. ३६२-३६७. १३९. परमामृतप्राप्तीसाठी क्षीराब्धिमंथनाचे कारण नाही. जे काळकूटाचे सहोदर । है मृत्युभेणे प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥ ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रस । जया वायांचि अमृतपणाचा आभास । तयाचाही मिठांश । जे पुरे म्हणों नेदी ॥ तया पाबळयाही येतुलेवरी । गोडियेची आथि थोरी । मग हे तंव अवधारी । परमामृत साचें ॥ जे मंदराचळ न ढॉळितां । क्षीरसागर न डहुळंतां। अनादि स्वभावतां । आइते आहे ॥...॥ जयाची गोठीचि ऐकतखेवो । अघवा संसार होय चावो । बळिया नित्यता लागे येवो । आपणपेयां। at ___१ मोठेपणाने. २ तुच्छ, हलकें. ३ संतोष पावे. ४ पर्णकुटीनें, झोपडीने. ५ नांव, दोष. ६ ताकाची निवळ. ७ गणना. ८ सामान्य. ९ पुष्ट झाला. १० वागतो. ११ बंधु. १२ दिवसाचे. १३ इंद्र. १४ आळ. १५ गोडी. १६ नाशिवंताला. १७ हलवतां. १८ घुसळतां. १९ ऐकतांक्षींच.