पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१२४ तैसे भोगा आंतूनि निघतां । चित्त मजमाजी रिगतां । हळु हळू पांडुसुता । मीचि होसील॥ अगा अभ्यासयोग म्हणिजे । तो हा एक जाणिजे । येणे कांहीं न निपजे । ऐसे नाहीं॥ पैं अभ्यासाचेनि बळे । एकांगती अंतराळे । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ॥ विष की आहारी पडे । समुद्री पायवाट जोडे। . एकी वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासे केले ॥ म्हणोनि अभ्यासासी कांहीं। सर्वथा दुष्कर नाहीं। यालागी माझ्या ठायीं । अभ्यासे मिळे ॥ ज्ञा. १२. १०४-११३. १२५. अभ्यासास उपयोगी स्थान कसे असावें? तरि विशेष आतां बोलिजेल । वरि ते अनुभवे उपेगा जाईल। म्हणोनि तैसें एक लागेल । स्थानः पहावे ॥ जेथ आराणुकेचेनि कोडे । बैसलिया उठी नावडे। वैराग्यासी दुणीव चढे । देखलियां जे॥ जो संती वसविला ठावो । संतोषासी सावाँवो। मना होय उत्सावो । धैाँचा ।।...॥ जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथां। पांखांडियाही आस्था। समूळ होय ॥...॥ ऐसेनि न राहतयाते राहावी । भ्रमतयाते बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीत ॥...॥ आणिकही एक पहावें । जे साधकीं वसते होआवें। आणि जनाचेनि पायरवे । मैळेचिना ॥ १ अंतरिक्षांत. २ सरळ. ३ वेद. ४ विस्ताराने. ५ सम्ाधान होण्याच्या. -६ आवडीनें. ७ दुप्पटपणा, दृढपणा. ८ सहाय. ९ वरून सहज गेले असतां. १० वर्दळीने. ११ मळत नाही.