पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६११४] साक्षात्कार हे बहु असो यापरी । कीर्तित माते अवधारी। एक विचरती चराचरी । पांडकुमरा ॥ ज्ञा. ९. १९७-२११ १२३. " पंगुं लंधयते गिरिम्." येणेचि अभ्यासेंसी योगु । चित्तासी करी पा चांगु। अगा उपायबळे पंगु । पहाड ठाको ॥ तेविं सदभ्यासे निरंतर । चित्तासि परम पुरुषाची मोहर। लावी मग शरीर । राहो अथवा जावो॥ जे नाना गीते पावविते । ते वित्त वरील आत्मयाते। मग कवण आठवी देहाते । गेले की आहे ॥ ज्ञा. ८. ८१-८३. १२४. अभ्यासास कोणतीच गोष्ट दुष्कर नाही. अथवा हे चित्त । मनबुद्धिसहित । माझ्या हाती अचंबित । न शकसी देवो ॥ तरि गा ऐसे करीं । यया आठां पाहारां माझारी । मोटकें निमिषभरी । देत जाई॥ मग जे जे कां निमिख । देखेल माझे सुख । तेतुले अरोचक । विषयी घेईल ॥ जैसे शरत्काल रिगे । मग सरिता वोहटूं लागे। तैसें चित्त काढेल वेगें। प्रपंचौनि ॥ . मग पुनवहनि जैसे । शशिबिंब दिसे दिसे। हारपत अंवसे । नाहींचि होय ॥ १ लंगडा. २ मार्ग. ३ समग्र, एकदम. ४ फक्त, थोड़ें. ५ दिवसे दिवस.