पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१२२] साक्षात्कार. चेइलियावरी पाही । स्वप्नींचिया तिये डोहीं। आपणयाते काई । काढूं जाइजे॥ तैं मी नेणे आतां जाणेन । है सरले तया दुःस्वप्न। जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकार ॥ मुखाभासेसी आरिसा । परता नेलिया वीरेशा। पाहतपणेवीण जैसा। पाहता ठाके ॥ तैसे नेणणे जे गेले । तेणे जाणणे ही नेलें। मग निष्क्रिय उरले । चिन्मात्रचि ॥ तेथ स्वभावे धनंजया । नाहीं कोणीचि किया । म्हणौनि प्रवाद तया । नैष्कर्म्य ऐसा ॥ ते आपुले आपणपे । असतचि होऊनि हारपे। तरंग का वायुलोपे । समुद्र जैसा ॥ तैसे न होणे निपजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे। सर्व सिद्धींत सहजें । परम हेचि ॥ देऊळाचिया कामा कळस । उपरम गंगेसी सिंधुप्रवेश : कां सुवर्णशुद्धी कस । सोळावा जैसा ॥ तेसे आपुले नेणणे । फेडिजे कां जाणणे । तेही गिळूनि असणे । ऐसी जे दशा॥ तियेपरत कांहीं। निपजणे येथ नाहीं। म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते ॥ परि हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि- काळी पावे ॥ ज्ञा. १८. ९६६-९८४. - - - - - - १२२. नामघोषगौरवाने विश्व धवळित होतें. तरि कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे : जे नामचि नाहीं पापाचें । ऐसे केले ।। १ नांव. २ उत्कर्षाने. ३ व्यापार.