पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१२० जयाचेनि वाक्यउजिवडे । जाहले चित्त निधई। ब्रह्माचेनि पाडे । निःशंक होय ॥ तेवेळी आपणपेया सहित । इये अशेषही भूते।। माझ्या स्वरूपी अखंडित । देखसी तूं ॥ ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेले। तें मोहांधकार जाईल। जै श्रीगुरुकृपा होईल। पार्था गा॥ ज्ञा. ४. १६५-१७१. १२१. गुरुकृपेनें आत्मसिद्धि. ऐसी कमैं साम्यदशा । होय तेथे वीरेशा। मग श्रीगुरु आपैसा। भेटेचि गा॥ रात्रीची चौपाहारी । वेचलिया अवधारी। डोळ्यां तमोरी। मिळे जैसा। कां येऊनि फळाचा घड । पारुषवी केळीची वाढ । श्रीगुरु भेटोनि करी पाड । मुमुक्षु तैसा ॥ मग आलिंगिला पूर्णिमा। जैसा उणीव सांडी चंद्रमा। तैसे होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥ . तेव्हां अबोधैंमात्र असे। ते तंव तया कृपा नाशे। तेथ निशिसवे जैसे। आंधारे जाय ॥ तैसी अबोधाचिये कुशी। कर्म कर्ता कार्य ऐशी। त्रिपुटी असे ते जैसी। गाभिणी मारिली ॥ तैसेचि अबोधनाशासवें । नाशे कियाजात आघवे । ऐसा समूळ संभवे । संन्यास हा॥ येणे मूळाशानसंन्यासे । दृश्याचा जेथ ठायो पुसे। तेथ बुझावे ते आपैसे। तोचि आहे ॥. ११ प्रकाशानें. २ उजाडेल. ३ आपोआप. ४ चारप्रहर. ५ सूर्य. ६ थांबवितो.. ७ सर्व अज्ञान. ८ जाणावें.