पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ ज्ञानेश्वरवचनामृत. [१११६ तैसें भक्तिहीनाचे जिणे । जो स्वप्नीही परि सुकृत नेणे। . तेणे संसारदुःखासि भोणे । वोगरिले ॥ ज्ञा. ९. ४३०-४४०. ११७. भक्तीचे स्वरूप. तैसा मी एकाचि परी । आतुर्डे गा अवधारी। जरि भक्ति येऊनि वरी। चित्ताते गा॥ परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी। धरांवांचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥ कां सकळजळसंपत्ती । घेऊनि समुद्राते गिवसिती। गंगा जैसी अनन्यगती। मिनलीच मिळे ॥ तैसे सर्वभावसंभारे । न धरत प्रेम एकसरें। मजमाजि संचरे । मीचि होऊनी॥ आणि तेवींचि मी ऐसा । थंडिये माझारी सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ तैसे मजलागुनी मुंगीवरी । किंबहुना चराचरी । भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं॥ तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवे। जाणितला तरी स्वभावे । दृष्टही होय ॥ __ज्ञा. ११. ६८५.-६९१. ११८. भक्ति म्हणजे अभेदज्ञान. म्हणोनि विश्व भिन्नभिन्न । परि न भेदे तयाचे ज्ञान। जैसे अवयव तरी आनआन । परी एकेचि देहींचे ॥ १ पुण्य. २ ताट. ३ वाढले. ४ स्वाधीन होतो. ५ धारा. ६ पृथ्वीवांचून - ७ दुसरी. ८ सामुग्री. ९ तीरावर. १० भिन्नभिन्न.