पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ११२] साक्षात्कार. १३९ आतां सुखेसी जीविता। कैंची ग्राहिकी कीजेल पंडुसुता। काय राखोडी फुकितां । दीप लागे॥ अगा विषाचे कांदे वांटुनी। जो रस घेईजे पिळुनी। तया नांव अमृत ठेउनि । जैसे अमर होणे ॥ तेवि विषयांचे जे सुख । ते केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां ने सरे ॥...॥ म्हणोनि मृत्युलोकी सुखाची कहाणी। ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं। कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांच्या ॥ जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी। जेथ उदय होय अस्तालागीं। दुःख लेऊनि सुखाची आंगी। सळित जगाते॥ जेथ मंगळाचिया अंकुरीं । सर्वेचि अमंगळाची पडे पोरी। मृत्यु उदाचिया परिवरी। गर्भ गिवसी ॥...॥ अगा गिंवसितां आघवां वार्टी। परतले पाउलचिनाही किरीटी। सैंघ निमालियांचिया गोष्टी । तिय पुराणे जोथिंची ॥...॥ ऐसी लोकींची जिये नांदणुक । तेथ जन्मले आथि जे लोक । तयाचिये निश्चितीचे कौतुक । दिसत असे ॥...॥ जव जव बाळ बळिया वाढे। तंव तंव भोजे" नाचती कोडे । आयुष्य निमाले आंतुलियकडे । ते ग्लानीचि गाहीं॥ जन्मलियां दिवसदिवसे । हो लागे काळाचिया चि ऐसे। की वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ .. अगा मर हा बोल न साहती। आणि मेलिया तरी रडती। परि असते जोत न गणिती । गहिसपणे ॥ दर्दुर साप गिळिजतु आहे उभा। की तो मासिया वेटॉळी जिभा। ... तैसे प्राणिये कवणे लोभा। वाढविती तृष्णा ॥ १३ - १ गिराइकी. २ सेवन केल्याशिवाय राहात नाहीं.३ गोष्ट.४ निखाऱ्यांच्या. ५ आंगरखा. ६ छळत आहे. ७ धान्यावर पडणारी कीड. ८ घरांत. ९ पुष्कळ, सर्व. १० बेफिकीरपणाचे. ११ संतोषाने. १२ आंतून. १३ खंती. १४ वाढदिवस. १५ असलेलें (आयुष्य) जात असतां. १६ मूर्खपणाने. १७ धरतो. :