पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ ज्ञानेश्वरवचनामृत. [$१०७ मग देहातचे दळे । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धिकरतळे । हातवसावें ॥ निसिले विवेकसाहाणे । जे ब्रह्माहमस्मि बोधे सणाणे । मग पुरतेनि बोधे उटणे । एकलेंचि ॥ . परि निश्चयाचे मुष्टिबळ । पाहावे एक दोन वेळ।। मग तुळावे अतिचोखाळ । मननवरी॥ पाठी हतियेरा आपणयां । निदिध्यासे एक जालिया। पुढे दुजें नुरेल घाया- पुरते गा ॥ ते आत्मज्ञानाचे खाँडे । अद्वैतप्रभेचे निवाडे । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥...॥ तेव्हां ऊर्ध्व कां अधोमूळ । कां आधींचे हन शाखाडाळ। ते कांहींचि न दिसे मृगजळ । चांदिणां जेवीं ॥ ज्ञा. १५. २५५-२६५. १०८. कामक्रोधलोमांच्या निर्मूलनाने आत्मसाक्षात्कार. आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायीं। ते त्यजावे हे काई । म्हणो कीर ॥ परि काम क्रोध लोभ । या तिहींचंचि थोब । थांव तेथे अशुभ । पिकले जाण ॥ . सर्वदुःखां आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधले आहाती॥.. कां पापियां नरकभोगी। सुवावयालागी जगीं। ... पातकांची दाटुंगी । सभाचि हे ॥ ते रौरव गा तवचि वरी। आइकिजती पटांतरी। जंव हे तिन्ही अंतरी । उठती ना ॥...॥ १ तरवारीचें म्यान.२ हस्तगत करून घ्यावे. ३ घासणे, पाजळणे. ४ तीक्ष्ण. ५ घासणे. ६ तरवार, शस्त्र. ७ बंड. ८ स्थिरावे. ९ वाटाडे. १० बलिष्ठ. ११ नरकविशेष. १२ परोक्षत्वाने. .....926