पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ - - ... . ज्ञानेश्वरवचनामृत. [६१०६ का नटलेनि लाघवे । नट जैसा ने झंकवे । तैसे गुणजात देखावें । न होनियां ॥...॥ सत्वरजतमांच्या । भेदी प्रसैर कर्माचा। होत असे तो गुणांचा । विकार हा ॥ ययामाजि मी ऐसा । वनीं कां वसंत जैसा । वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥ का तारांगणीं लोपावें । सूर्यकांती उद्दीपावें। कमळी विकासावे । जावे तमे ॥ यया कोणाचे काहीं । सविता जैसा देखत नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ॥..... ऐसेनि विवेके जया । उदय होय धनंजया। ये गुणातीतता तया । ऊर्ध्वपंथे ॥ आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणे अचुक । जे ज्ञाने केले टीक । तयाचिवरी ॥ किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता। पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा॥ नलिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला। तैसा मूळ अहंता ठाकिला । तो मी म्हणौनि ।। अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा। तो स्वरूपी प्रबुद्धा । चेइली की ॥ पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा। म्हणौनि प्रकृतिमुखाभासा । मुकला तो॥ देहाभिमानाचा वारा । आतां वाजों ठेला वीरा । ते ऐक्य वीचिसागरां । जीवेशां है ॥ म्हणौनि मद्भावेसीं । प्राप्ति पाविजे तेणे सरिसी। वर्षानी आकाशीं । घनजात जेवीं॥ १ ठकबाजीनें. २ फसला जात नाही. ३ विस्तार. ४ मोत्यांचा झुबका. ५प्राप्त झाला. ६ जागा झाला. ७ वाहण्याचा. ८ लाट व समुद्र. HI... . .......