पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ शानेश्वरवचनामृत. [६१०४: - १०४. स्वकर्मकुसुमांनी विश्वात्मक ईश्वराची पूजा. येणे जग हे समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित । जाले आहे दीपजात । तेजे जैसे ॥ तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागीं ॥ म्हणोनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें। वैराग्यासिद्धि देइजे । पैसाय तया ॥ जिये वैराग्यदशे । ईश्वराचेनि वेधवशे। . हे सर्वही नावडे जैसें । वांत होत ॥ प्राणनाथाचिया आधीं । विरहिणी जिणेही बाधी। तेसे सुखजात त्रिशुद्धि । दुःखचि लागे.॥ सम्यग्ज्ञान नुदैजतां । वेधचि तन्मयता। उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥ म्हणौनि मोक्षलाभासाठीं । जो व्रते वाहतसे आंगीं। तेणे स्वधर्मु आस्था चांगी। अनुष्ठावा॥ ...... ज्ञा. १८. ९१६-९२२. १०५. प्रकृतिपासून सत्त्वरजतमांची उत्पत्ति. तरि सत्वरजतम । तिघांसि है नाम । आणि प्रकृति जन्म- भूमिका यया ॥...॥ हे एकेचि वृत्तीच्या ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं। वयसात्रय देहीं । येकी जेवीं ॥ का मीनलेनि कीड़ें। जंव जंव तुक वाढे। तंव तव सोने हीन पडे । पांचिका कसी:॥...॥ .....१. संतुष्ट होऊन. २ प्रसाद.-३-निश्चयेंकरून. ४ श्रद्धेनें. ५ वजनः-६ पांच रुपये तोळा, हीनकस.. . ...... " .