पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ ६१०३] नीतिविचार.. या देहाचिये बांदोडी न पडिजे। सुखदुःखांचिया सागरीन बुडिजे। ... सुखे सुखरूपा घडिजे । माझियाचि आंगा ॥ ज्ञा. ९.४००-४०६... १०३. कमैं ईश्वरार्पण केल्याने ईश्वरप्राप्ति. का अभ्यासाही लागी । कसं नाहीं तुझिया आंगीं।.. तरि आहासि जया भागीं । तैसाचि अस॥.. इंद्रिये न कोडीं। भोगाते न तोडीं। अभिमान न सांडी। स्वजातीचा॥... कुळधर्म चाळीं। विधिनिषेध पाळीं। . मग सुखें तुज सरळी । दिधली आहे॥ परि मने वाचा देहे । जैसा जो व्यापार होये। तो भी करीत आहे । ऐसे न म्हणे ॥ करणे कां न करणे । हैं आघवे तोचि जाणे। विश्व चळतसे जेणे । परमात्मेनि ॥...॥ म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति । इये वोझी नेघे मती। अखंड चित्तवृत्ति । माझ्या ठायीं ॥ येन्हवीं तरी सुभटा। उजू का अव्हांटा। .. रथ काई खटपटा । करित असे॥ आणि जे जे कर्म निपजे । ते थोडे बहु न म्हणिजे। निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायीं ॥ ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना। तूं सायुज्यसदना । माझिया येसी ॥ - ज्ञा. १२. ११४-१२४. १ बंधन. २ बळ. ३ आचरण कर. ४ मोकळीक. ५ ऋजु, सरळ