पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९९] नीतिविचार. १२३ मज येतां मैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा। .. स्वर्ग नरक या वाटा। चोरांचिया ॥ . स्वर्गा पुण्यात्मके पापें येइजे। पापात्मके पापे नरका जाइजे। मग माते जेणे पाविजे । ते शुद्धपुण्य ॥ आणि मजचि माजी असतां । जेणे मी दुहावे पंडुसुता। ते पुण्य ऐसे म्हणतां । जीभ न तुटे काई ॥...॥ मग मी न पविजे ऐसे । जे पापरूप पुण्य असे। ते साधलेनि सौरसे । स्वर्गा येती॥...॥ मग तया पुण्याची पाउँठी सरे । सर्वेचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारे । मृत्युलोकां॥ जैसा वेश्याभोगी कवडा वेचे । मग दारही चेपू न ये तियेचें। तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे । काय सांगों ॥...॥ अर्जुना वेदविद जरी जहला । तरी मात नेणतां वायां गेला। कण सांडूनि उपणिला । कोडा जैसा ॥ म्हणऊनि मज एकेविण । हे त्रयोधर्म अकारण । आतां माते जाणोनि कांही नेण । तूं सुखिया होसी॥ ज्ञा. ९.३०७-३३४. .९९. स्वधर्म हाच कामधेनु होय. आतां येचि विषयीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा।.. मैं सृष्टयादि संस्था । ब्रह्मेने केली ॥ ते नित्ययागसहित । सृजिली भूते समस्ते। परि नेणतींचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणउनी ॥ ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा । देवा काय आश्रयो येथ आम्हां। तंव म्हणे तो कमलजन्मा । भूतांप्रति॥ . .१ आडमार्ग. २ दूर होतो. ३ योग्यतेनें, बळाने. ४ पायरी. ५ अधिकार, तेज. ६ पाखडला. ७व्यवस्था......... .. .. .. ।