पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.८६] नीतिविचार. . जागणे जरी जाहले । तरि व्हावे ते मितले । येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सुख ॥ - ज्ञा.. ३४९-३५१. ८६. साधूची आत्यंतिक समता. पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं। । रिपु मित्रां दोहीं। सरिसा पाडु ॥ का घरिचियां उजेड करावा । पारिकियां आंधार पाडावा। .. हे नेणेचि गा पांडवा ।दीप जैसा॥ जो खांडावया घाव घाली । कां लावणी जयाने केली। दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा॥ नातरि इक्षुदंड। पाळितया गोडु।। गाळितया कडु । नोहेचि जेवीं॥ अरिमित्री तैसा । अर्जुना जया भाव ऐसा । मानापमानी सरिसा । होत जाय ॥...॥ जो निदेते नेघे । स्तुतीन श्लाघे आकाशा नलगे । लेप जैसा ॥...॥ सार्च लटिके दोन्हीं। न बोले जाहला मौनी। जो भोगितां उन्मनी । आरॉयेना॥ जो यथालाभ संतोषे । अलासें न पारुखे । पाउसेविण न सुके । समुद्र जैसा.॥ आणि वायूसी एके ठायीं । बिढार जैसे नाहीं। .. तैसा न धरीच कहीं। आश्रय जो ॥...॥ हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । । किंबहुना चराचर । आपण जाहाला॥ ज्ञा. १२. १९७-२.१३. १ सारखा. २ योग्यता. ३ परक्यांस. ४ तोडण्याकरितां. ५ ऊस. ६ खरें ७ तृप्त होत नाही. ८ रुष्ट होत नाही. ९ आश्रय, राहण्याची जागा. . :