पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

LI ११० ज्ञानेश्वरवचनामृत. [६८३ गृहस्थाश्रमाचे वोझ । कपाळी आधींचि आहे सहजें। की तेचि संन्यासे वाढविजे। सरिसे पुढती॥ म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां।। आहे योगसुख स्वभावतां । आपणपांचि ॥ ज्ञा. ६. ४९-५३. ८४. संकल्पनाशाने परमात्म्याचे सांनिध्य. तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता। परमात्मा परौती । दूर नाहीं ॥ जैसा किंडाळाचा दोष जाये । तरि पंधरे तेंचि होये । तैसे जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं॥ हा घटाकार जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळो जाणे आकाशां । आना ठाया ॥ तैसा देहाहंकार नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला। तोचि परमात्मा संचला। आधींचि आहे ॥ ज्ञा. ६. ८१-८४. ८५. परिमितता. आहार तरी सेविजे । परि युक्तीचनि मापे मंविजे। क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिति ॥ मापितला बोल बोलिजे। मितलिया पाउलीं चालिजे। निद्रेही मान दीजे । अवसरे येके ॥ .... १ मर्यादा. २ पलीकडे. ३ हीणकस. ४ उत्तमकशी-सोनें. ५ दुसन्या. ६ खोटा. ७ सर्वत्र साचलेला. ८ नियमाच्या. ९ मोजावा. १० मोजका.१ मालक्या,