पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ ज्ञानेश्वरवचनामृत, [६८१ आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी। ... बोलणे ते वृष्टि । इंगळांची ॥ येर जे क्रियाजात । ते तिखयाचे कर्वत । ऐसें सबाह्य खसखसित । जयाचे गा॥ तो मनुष्यांत अधम जाण । पारुष्याचे अवतरण । आतां आइक खूण । अज्ञानाची ॥ तरी शीतोष्णस्पर्शा। निवाड नेणे पाषाण जैसा। का रात्री आणि दिवसा । जात्यंध तो ॥...॥ ना तरि ते नाना रसीं । रिघोनि दैर्वी जैसी। परि रसस्वादासी । चाखो नेणे ॥...॥ हे चोख हे मैळ । ऐसे नेणोनिया बाळ। देखे ते केवळ । मुखींचि घाली॥ तैसें पापपुण्याचे खिचे । करोनि खातां बुद्धि चेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा॥ तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन। ... एवं साही दोषांचे चिन्ह । सांगितले ॥ इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी। जैसे थोर विष भुजंगी। अंग साने ॥...॥ परि क्रूर ग्रहांची जैसी । मांदी मिळे एकचि राशी। कां येती निंदकापासी । अशेष पापे ॥ मरणाराचे अंग । पडिघाती अवघेचि रोग । कां कुमुहूर्ती दुर्योग । एकवटी॥...॥ कां आयुष्य जातिये वेळे । शळिये सातवेउळी मिळे। तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥ मोक्षमार्गाकडे । जयाचा आंबुखा पडे। न निघे म्हणौनि बुडे । संसारी जो॥ - १ वारूळ. २ बाणांची. ३ निखाऱ्यांची. ४ पोलादी. ५ काठिण्याचें. ६ जन्मांध. ७ पळी. ८ खिचडी. ९ बळकट. १० लहान. ११ समुदाय. १२ व्यापतात. १३ सात नांग्यांची इंगळी. १४ आवरण, आच्छादन.