पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८१] , नीतिविचार.. तृणाचेनि इंधने । आगी धांवे गगने । थिल्लरबळे मीने । न गणिजे सिंधु ॥ तैसा माजे स्त्रियाधनें । विद्यास्तुती बहुते माने । एके दिवसींचेनि परान्ने । अल्पकु जैसा ॥ अभ्रच्छायेचिया जोडी । निदेव घर मोडी। मृगांबु देखोनि फोडी । पाणियाढे मूर्ख ॥ किंबहुना ऐसैसे। उतणे जे संपत्तिमिसे । तो दर्प गा अनारिसे । न बोले घेई ॥...॥ पतंगा नावडे ज्योति । खद्योता भानूची खंती। टिटिभेने अपांपति । वैरी केला ॥ तैसा अभिमानाचेनि मोहे । ईश्वराचेही नाम न साहे। बापाते म्हणे मज हे । सवती जाली। ऐसा मान्यतेचा पुष्टगंड । तो अभिमानी परम लंड । रौरवाचा रूढ । मार्गचि पैं ॥ आणि पुढिलांचे सुख । देखणियांचे होय मिष । चढे क्रोधाग्नीचे विख । मनोवृत्ति ॥ शीतजळाचिये भेटी । तातला तेली आगी उठी। *चंद्र देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा॥ विश्वाचे आयुष्य जेणे उजळे । तो सूर्य उदैला देखोनि सवळे। पापिया फुटती डोळे । डुडुळांचे ॥ जगाची सुख पहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट । दुधाचे काळकूट । होय व्याळी ॥ अगाधे समुद्रजळे । प्राशितां अधिक जळे। वडवाग्नि न मिळे । शांती काहीं॥ तैसा विद्याविनोदवैभवे । देखे पुढिलांची दैवें। तंव तंव रोष दुणावे । क्रोध तो जाण ॥ '. १ डबकें. २ दरिद्री. ३ तळे. ४ टिटवाने. ५ ज्याचे गाल फुगलेले आहेत असा. ६ तापलेल्या. ७ प्रातःकाळी. ८ घुबडाचे.