पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ ज्ञानेश्वरवचनामृत. की गुणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा। ... वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिवसीत असे ॥ की सव्वीसगुणज्योती। इहीं उजळोनि आरती। गीता आत्मया निजपती-1 नीराजना आली॥ उगळिते निर्मळे । गुण इयेचि मुक्ताफळे । दैवी शक्तिकळे । गीतार्णवींची॥ काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ति ये आपैसी। केलें दैवी गुणराशी- संपत्ती रूप ॥ ज्ञा. १६. २०७-२१२. - - ८१. आसुरीसंपत्तीचे वर्णन. तरी तयाचि आसुरा । दोषांमाजि जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभं ऐसा ॥ जैसी आपुली जननी । नग्न दाविलीया जनीं। ते तीर्थचि परि पतनीं । कारण होय ॥ का विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलीया चोहटां। तरि इष्टदाचि परि अनिष्टा । हेतु होती ॥ पैं आंगे बुडतां महापुरीं । जे वेगे काढी पैलतीरीं। ते नावचि बांधिलिया शिरीं । बुडवी जैली ॥...॥ तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्म जाला तो फोकारिजे देखा। तरि तारिता तोचि दोखा-लागी होय ॥ म्हणौनि वाचेचा चौबारां । घातलिया धर्माचा पसारा। धर्मचि तो अधर्म होय वीरा । तो दंभ जाणे ॥...॥ मांदुरी लोकांचा घोडा । गजपतीही मानी थोडा। कां कांटियेवरिलिया सरडा । स्वर्गही नीच ॥ ....आरती ओवाळण्याला. २ उघडणारी. ३ मोठेपणाची. ४ टिमकी५ पुकारली असतां. ६ उघडा करणे. ७ चव्हाटा. ८ चाबुकस्वार. । ।