पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ६८०] नीतिविचार. आतां निर्वाळुनि कनके । भरिला गांगे पीयूषं । तया कलशाचिया सारखे । शौच असे ॥ जे आंगीं निष्काम आचार । जीवीं विवेक साचार । तो सबाह्य घडला आकार । शुचित्वाचाचि ॥ का फेडित पाप ताप । पोखित तीरीचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥ कां जगाचे आंध्य फेडित । श्रियेची राउळे उघडित । निघे जैसा भास्वत । प्रदक्षिणे ॥ तैसी बांधलीं सोडित । बुडालीं काढित । सांकडी फेडित । आतांचिया ॥ किंबहुना दिवसराती। पुढिलांचे सुख उन्नती। आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे॥ वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजातांच्या अहितभागीं। संकल्पाचीही आडवंगी। न करणे जे ॥ पैं अद्रोहत्व ऐसिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी। ते सांगितले हे दिठी । पाहों ये तैसें ॥ आणि गंगा शंभूच्या माथां । पावोनि संकोचली जेविं पार्था । तेविं मान्यपणे सर्वथा । लाजणे जे ॥ ते हे पुढतपुढतीं ।अमानित्व जाण सुमति । मागां सांगितलेसे किती । तेचि ते बोलो॥ ज्ञा. १६. १८६.-२०६... एवं इहीं सविसे । ब्रह्मसंपदा हे वसत असे। मोक्षचक्रवर्तीचे जैसे । अग्रहार होय ॥ ना ना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थाची नित्यनवी। निर्विण्णसगरांच्या दैवीं । गंगाचि आली ॥ .. १ शुद्धकरून. २ पाण्याने. ३ दूर करीत. ४ आंधळेपणा. ५ठिकाणे, मंदिरे. • ६ संकटें. ७ अडथळा, प्रतिबंध. ८ इनामगांव. ९ विरक्त.