पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ - ज्ञानेश्वरवचनामृत. [६८. अगा अपैशुन्याचे लक्षण । अर्जुना है फुडे जाण । मोक्षमार्गाचे सुखासन । मुख्य हे गा॥ आतां दया ते ऐसी । पूर्ण चंद्रिका जैसी। निववितां न कडसी । साने थोर ॥...॥ मैं जगी जीवनासारिखे। वस्तु आंगवरी उपखे। परि जाते जीवित राखे । तृणाचंही ॥ तैसें पुढिलांचेनि तापे । कळवळलीये कृपे । दिधले ही आपणपे । न्यूनचि मानी॥...॥ पें पायीं कांटा नेहटे । तव व्यथा जीवीं उमटे। तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनि ॥ कां पावो शीतळता लाहे । की ते डोळ्याचिलागी होये। .... तैसा परसुखे जाये । सुखावत जो॥ किंबहुना तृषितालागीं । पाणी आयिले असे जगीं। तैसें दु:खितांचे सेलभांगी । जिणे जयाचें ॥ तो पुरुष वीरराया। मूर्तिमंत जाण दया। मी उदयजतांचि तया । ऋणिया लाभे ॥ आतां सूर्यासी जीवे । अनुसरलियां राजीवे । परि ते तो न शिवे । सौरभ्य जैसे ॥ कां वसंताचिया वाहाणीं। आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी। ते न करीतचि घेणी । निघाला तो॥ है असो महासिद्धींसीं। लक्ष्मीही आलिया पाशीं । परि महाविष्णु जैसी । न गणीचि ते ॥ तैसे ऐहिकींचे का स्वर्गीचे । भोग पाइक जालिया इच्छेचे । परि भोगावे हे न रुचे । मनामाजी ॥ बहुवे काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी। अलोलुप्त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥ - १ दुष्टपणाचा अभाव. २ कसास लावणे, विचार करणे. ३ पाणी. ४ नाश पावते. ५ जोराने लागे. ६ उत्पन्न केले. ७ उत्तम वांटा. ८ कमळ, ९ चाकर.