पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८०] नीतिविचार. तया नांव त्याग । म्हणे तो यज्ञांग। हे मानूनि सुभग । पार्थ पुसे ॥ आता शांतीचे लिंग । ते व्यक्त मज सांग। देवो म्हणती चांग । अवधान देई॥ तरी गिळोनि शेयाते । ज्ञाता ज्ञानही माघौतें। हारपे निरुते । ते शांति पैं गा॥ जैसा प्रळयांबूचा उभड । बुडऊनि विश्वाचा पेवाड। होय आपण निबिड । आपणचि ॥ मग उगमओघसिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु। परि जलैक्याचा बोधु । तोही कवणा ॥ तैसी ज्ञेया देतां मिठी । झातृत्वही पड़े पोटीं। मग उरे तोचि किरीटी । शांतीचे रूप ॥ आतां कदर्थवित व्याधी । बळीकरणाचिया आधी । आपपर न शोधी । सद्वैद्य जैसा ॥ का चिखली रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥ ना ना बुडतयातें सकरुण । न पुसे अंत्यज की ब्राह्मण । कादनि राखे प्राण । हेचि जाणे ॥ की मार्यवणी पापियें । उघडी केली विपाये। ते नेसविल्याविण न पाहे । शिष्ट जैसा ॥...॥ अगा पुढिलांचे दोष । करूनि आपुलिये दिठी चोख । मग घापे अवलोक । तयावरी ॥ जैसा पुजनि देव पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषोनि प्रसाद घेइजे । अतिथीचा ॥ तैसे आपुलेनि गुणे । पुढिलांचे उणे । फेबुनियां पाहाणे । तयाकडे ॥...॥ न १ उमाळा. २ विस्तार. ३ त्रास देत असतां. ४ बरे करण्याच्या. ५ कासाबोस. ६ पतिव्रता.