पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.८०] . नीतिविचार. तैसे अधिकारपालोचें । हे यश करणे सर्वांचे। .... परि विष फळाशेचे । न घापे माजी ॥...॥ आतां चंडवे भूमी हाणिजे । हे नव्हे तो हातां आणिजे । की शेती बी विखुरिजे । परी पिकी लक्ष॥...॥ हे बहु असो आरिसा । आपण देखावया जैसा। पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥ तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर । तो होआवयालागीं गोचर। श्रुतीचा निरंतर । अभ्यास करणे ॥ ते द्विजांसींच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र का नाममंत्र। आवर्तणे पवित्र । पावावया तत्व ॥ पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो। आतां तपशब्दाभिप्रावो । आईक सांगों ॥...॥ . ना ना धूपाचा आग्निप्रवेश । कनकी तुकाचा नाश । पितृपक्ष पोशितां हास । चंद्राचा जैसा॥ तैसा स्वरूपाचिया प्रसरा- लागी प्राणेद्रियशरीरां । आटणी करणे जे वीरा । तेचि तप ॥.. ज्ञा. १६.६८-१०८. आतां बाळाच्या हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य। तैसे प्राणिमात्री सौजन्यं । आर्जव ते ॥ आणि जगाचिया सुखोद्देशे । शरीरवाचामानसे। राहाटणे ते अहिंसे । रूप जाण ॥ .. आतां तीख होऊनि मवाळ । जैसे जातीचे मुकुळ। कां तेज परि शीतळ । शशांकाचे। शके दावितांचि रोग फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडू। ते वोखद नाहीं मा घडूं। उपमा कैंची ॥ १ अधिकारपरत्वे. २ टाकणे. ३ घासणे, पुसणे. ४ जपणे. ५ वजनाचा. ६ मैत्री. तिखट. ८ मृदु, ९ कमळ.