पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. मत्य आहे. यावरून ज्ञानेश्वरांचा जन्म शके ११९७ मध्ये झाला या मतास बळकटी येते. असो. विठ्ठलपंत “चैतन्याश्रमवासी " असून “ गृहवासी" झाल्याने त्यांची लोकांनी थट्टा चालविली. त्यांस व त्यांच्या मुलांस त्यांनी वाळीत टाकिलें... त्यामुळे आपल्या मुलांची मुंज व सोडमुंज होईना, म्हणून पुनः वैराग्य उत्पन्न होऊन ते आपल्या चारी मुलांस बरोबर घेऊन त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीस प्रदक्षिणा घालण्याच्या उद्देशाने तिकडे गेले. ब्रह्मगिरीस रोज त्यांचा प्रदक्षिणा घालण्याचा क्रम चालू असतां एके दिवशी झाडीतून एका वाघाने त्यांजवर झडप घातली. त्यावेळी वाघाच्या तावडीतून आपली सुटका करण्याच्या उद्वेशाने ते आपल्या मुलांस घेऊन बाजूस होतात न होतात तोच निवृत्तिनाथांची व त्यांची चुकामूक पडली. कर्मधर्मसंयोगाने निवृत्तिनाथ तेथन जे गेले ते थेट गहिनीनाथांच्या गुहेत गेले. ही. गुहा अद्याप ब्रह्मगिरीवर दृष्टीस पडते. तेथे त्यांस गहिनीनाथांनी उपदेश देऊन त्यांजवर वरदहस्त ठेविला. तेथून पुढे निवृत्तिनाथ परत देऊन आपल्या भावंडांस मिळाले. त्यानंतर लौकरच विठ्ठलपंतांचे देहावसान झाले असावे असे दिसते; पण त्याचा शक उपलब्ध नाही. आतां आपल्या सर्व लहान भावंडांची काळजी निवृत्तिनाथांवरच येऊन पडली. याच प्रसंगी निवृत्तिनाथांकडून ज्ञानेश्वरांस परमार्थाचें रहस्य प्राप्त झाले असले पाहिजे असे दिसते. त्या सर्व मुलांची बुद्धिमत्ता व परमार्थाचे ओज इतकें जबरदस्त होते की त्यांनी पैठणच्या ब्राम्हणांकडून, व हेमाडपंत, बोपदेव यासारख्या मुत्सद्दी व विद्वान् गृहस्थांकडून शके १२०९ मध्ये शुद्धिपत्र मिळविले. त्यानंतर ती भावंडे नेवासे येथे आली. तेथें सच्चिदानंदबाबा मरणोन्मुख असता त्यास ज्ञानेश्वरांनी वाचविले. या उपकाराच्या स्मृतीने सच्चिदानंदबाबा ज्ञानेश्वरचिा आदराने लेखकु झाला. ज्ञानेश्वरी शके १२१२त लिहिली गेली हे प्रसिद्धच आहे. नेवासे येथे देवालयांतील एका खांबावर नंदादीपाची एक देणगी कोरलेली आहे, या खांबास बसून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी सांगितली असे म्हणतात. यानंतर निवृत्तिनाथांनी आतां एक स्वतंत्र ग्रंथ रच असें ज्ञानेश्वरांस सांगितल्यामुळे त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला असे म्हणतात. यानंतर ज्ञानेश्वर आपल्या निवृत्ति व इतर भावंडांसहवर्तमान पंढरपुरास गेले. तेथें नामदेवांची व त्यांची भेट होऊन नामदेवांप्रमाणेच हेही पंढरीसांप्रदायाचे आद्य आचार्य बनले. निवृत्तिनाथज्ञानेश्वरादिकांनी जे अभंग रचले ते या प्रसंगानंतरचे असावेत. नंतर शके १२१५ मध्ये ज्ञानदेव व नामदेव यांनी इतर संतांसहवर्तमान उत्तर हिंदुस्थानची यात्रा करण्याचे