पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ७९] नीतिविचार. परि बापुडा ऐसे नेणे । जे वेश्येचे सर्वस्व देणे । तेचि ते नागवणे । रूप येथ ॥ संवचोरीचे साजणें । तेचि ते प्राण घेणे । लेपा स्नपने करणे । तोचि नाश ||...॥ सन्मुख शूला । धांवतया पाये चपळा । प्रतिपदी जवळा । मृत्यु जेवीं ॥ तेविं देहा जंव जंव वाढ । जंव जंव दिवसाचा पवाड । जंव जंव सुरवाड। भोगाचा यया ॥ तंव तंव अधिकाधिके । मरण आयुष्यात जिंके। मीठ जवि उदकें । घांसिजत असे ॥...!! कडॉडी लोटला गाडा। कां शिखरौनि सुटला घोडा। तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे ॥ का आडवोहळा पाणी आले । कां जैसें म्हैसयांचे झुंज मातले। तैसे तारुण्याचे चढले । भुररे जया ॥...॥ तरि वाघाचिये अडवे । एकवेळ आला चरोनि दैवें। तेणे विश्वासे पुढती धांवे । वसू जैसा॥ का सर्पघराआंतु । अवचटे ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठी निश्चितु । नास्तिक होय ॥ तैसेचि अवचटें है। एक दोनीचिं वेळां लाहे। .. एथु उरग एक आहे। हे मानीना जो॥..॥ सर्वळोचि वियोग पडेल । विळौनि विपत्ति येईल । है दुःख पुढील । देखेना जो ॥....॥ वयंसेचेनि उवायें। संपत्तीचेनि सावाये ॥ सेव्यासेव्य जाये । सरकटित ॥...॥ - १ लुटणे. २ सांवासारखा चोर. ३ मैत्री. ४ मातीच्या चित्राला. ५ स्नान. ६ अनुकूलता. ७ कड्यावरून. ८ आडरानांतील वोहळ. ९ भुलीं, वेड. १० अरण्यांत..११ अवचित्. १२ एवव्यानेच. १३ साप. १४ लवकरच. १५. वेळाने. १६ तारुण्याच्या. १७ उत्कर्षाने. १८ मदतीने. . . . . . :