पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७३] नीतिविचार. अर्जुना तेणे पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोडे । कांहींचि जावों। जयाचे मनीं आलस्य । देहीं आतिकाश्य । शमदमी सौरस्य । जयासि गा ॥ तपोव्रतांचा मेळावा । जयाचे ठायीं पांडवा। युगांत जया गांवा-। आंत येता॥ बहु योगाभ्यासी हांव । विजनांकडे धांव । न साहे जो नांव । संघाताचें ॥ नारांचांची आंथुरणे । पूयपंकी लोळणे । तैसे लेखी भोगणे । ऐहिकीचे ॥ आणि स्वर्गात मानसे । ऐकोनि मानी ऐसे। कुहिले पिशित जैसे । श्वानाचे कां ॥ ते हे विषयवैराग्य । आत्मलाभाचे भाग्य । येणे ब्रह्मानंदा योग्य । होती जीव ॥ ऐसा उभयलोकी त्रास । देखसी जेथ बहुवस । जाण तेथे रहिवास । शानाचा तूं ॥ ज्ञा. १३. ५१३-५२४. ७३. अनहंकार. आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्ते करी। परी केलेपण शरीरीं । वसो नेदी॥ वर्णाश्रमपोषके । कर्मे नित्यनैमित्तिके। यामाजी कांहीं न ठके । आचरतां ॥ परि हे मियां केलें । की है माझेनि सिद्धी गेले। .... ऐसे नाहीं ठेविले । वासनेमाजी॥ जैसे अवचितपणे । वायूसी सर्वत्र विचरणे । १.मानंद, गोडी, २ अरण्याकडे. ३ समुदायाचें. ४ बाणांची. ५ समजतो. ६ कुजलेलें. ७ मांस. ८ आशेखोराप्रमाणे - -