पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ८२ ज्ञानेश्वरवचनामृत. [. म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखेल । तरि जीवां टेकेल । म्हणोनि बिहे ॥ बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति केळासी। करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥...॥ मनाचिया महाद्वारी । प्रत्याहाराचिया ठाणांतरीं। जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥ . आधारी नाभी कंठीं। बंधत्रयाची घरटी। चंद्रसूर्यसंपुटीं । सुये चित्त॥ समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानासी। चित्त चैतन्य समरसी। आंतु रते ॥ अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हे जाणिजो। हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥ जयाची आज्ञा आपण । शिरी वाहे अंतःकरण । मनुष्याकारे जाण । ज्ञानचि तो।। ज्ञा. १३. ५०२-५१२. ७२. वैराग्य. आणि विषयाविखीं। वैराग्याची निकी। पुरवणी मानसी की। जिती" आथी ॥ वमिलिया अन्ना । लाळ न घोटी जो रसना। कां मांग न सुये आलिंगना । प्रेताचिया । विष खाणे नागवे । जळत घरी न रिगवे। व्याघ्रविवरां न वचवे । वस्ती जेवीं॥ धडाडीत लोहरसीं। उडी न घालवे जैसी। न करवे उशी। अजगराची ॥ १ डांकीण. २ भितो. ३ व्यभिचारिणी. ४ दांडगा. ५ बांधून ठवितो. ६ देखरेख. ७ चौकीवर. ८ गस्त. ९ चांगली. १० सांठा, मदत. ११ बिवंत. '१२ आवडत नाही. १३ वाघाच्या गुहेत. १४ तापलेल्या. + .