पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६९] .... नीतिविचार. - ६९. शुचित्व. म्हणे शुचित्व गा ऐसे । जयापाशी दिसे। आंग मन जैसें । कापुराचे ॥ कां रत्नाचे दळवाडे । जैसे सबाह्य चोखडें । आंत बाहेरी एके पाडे । सूर्य जैसा। बाहेरीं कम क्षाळला । भीतरी ज्ञाने उजळला। इहीं दोहीं परीं आला। पाखाळा एका ॥...॥ .. येहवीं तरी पांडुसुता । अंतर शुद्ध नसतां। बाहेरी कर्म तो सर्वथा । विटंबु गा॥ मृत जैसा शृंगारला । गाढव तीर्थी न्हाणिला। कडु दुधिया माखिला । गुळे जैसा ॥ वोसगृहीं तोरण बांधिले । कां उपवासी अन्ने लिंपिले। कुंकुमसेंदुर केले। कांतहीनेने ॥ कलश ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ। काय करूं चित्रींव फळ । आंत शेण ॥ तैसें कर्मी वरिचिलेकडा । न सरे थोर मोले कुडी। नव्हे मदिरेचा घडा। पवित्र गंगे॥ म्हणोनि अंतरी ज्ञान व्हावे । मग बाह्य लाभे स्वभावे। वरि शान कम संभवे । ऐसें के जोडे । यालागीं बाह्यभाग । कर्मे धुतला चांग। शाने फिटला वंग । अंतरीचा ॥ . तेथ अंतर्बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहाले। किंबहुना उरले । शुचित्वचि। म्हणोनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत। स्फटिकगृहींचे डोलत। दीप जैसे ॥...॥ १ स्वरूप. २ शुद्ध. ३ धुतला, शुद्ध झाला.४ शुद्धतेला. ५लिंपला. ६ शून्यपरी. ७ मुलाम्याचे. ८ वाईट. ९ कलंक.