पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ ज्ञानेश्वरवचनामृत. [६६८ जयाचे वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावांचूनि शस्त्र । हाती न शिवे॥ शिवतले गुरुचरणीं । भलतैसे हो पाणी। तेथ सकळ तीर्थं आणी। त्रैलोक्यींची॥ श्रीगुरुचे उशिटें । लाहे जै अवचटें। त तेणे लाभे विटे। समाधीसी॥ कैवल्यसुखासाठी। परमाणु घे किरीटी। उधळती पायापाठीं। चालतां जे॥ हे असो सांगावे किती । नाहीं पार गुरुभक्ती। परी गा उत्क्रांतमति । कारण है। जया इये भक्तीची चाड । जया इये विषयींचे कोड। जो हे सेवेवांचून गोड । न मनीं कांहीं॥ तो तत्त्वज्ञानाचा ठावो । ज्ञाना तेणेचि आवो। हे असो तो देवो । ज्ञान भक्त॥ हे जाण पां साचोकारें । तेथ ज्ञान उघडेनि द्वारें। नांदत असे गा पुरें । इया रीती ॥ जिये गुरुसेवेविखीं । माझा जीव अभिलाखीं। म्हणोनि सोयचुकी । बोली केली ॥ येन्हवीं असतां हाती खुळा । भजनावधानी आंधळा । परिचर्येलागी पांगुळा- पासूनि मंद ॥ गुरुवर्णनी मुका । आळशी पोशिजे फुका। परि मनी आथीं निको । सानुराग ॥ तेणे पैं कारणे । हे स्थूल पोसणे । पडले मज म्हणे । शानदेवो ॥ ज्ञा. १३. ४४२-४५९ १ व्यापकबुद्धीचा, ज्ञाता. २ डौल, शोभा. ३ मार्ग सोडून. ४ लुला, थोटा. ५ चांगले, खरे. ६ अनुरागयुक्त.