पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TETTE ६६८] नीतिविचार. जंव देह है असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल । मग देहांती नवल । बुद्धि आहे ॥ इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती। जेथ श्रीचरण उभे ठाती। श्रीगुरुचे॥ माझा स्वामी कवतिके । स्पर्शत जिये उदके। तेथ लया नेईन निके। आपी आप ॥ .. श्रीगुरू वोवाळिजती । कां भुवनी जे उजळिजती । तया दीपांचिया दीप्ती । ठेवीन तेज ॥ चवरी हन विजणा । तेथ लय करीन प्राणा। मग अंगाचा वोळंगणा । होईन मी ॥ जिये जिये अवकाशीं । श्रीगुरू असती परिवारसी। आकाश लया आकाशीं । नेईन तिये ॥ ज्ञा. १३. ४३१-४३६. एखादिया वेळां । श्रीगुरूचिया खेळा । लोण करी सकळां । जीविताचे ॥ जो गुरुदास्य कृश । जो गुरुप्रेमे सपाय। जो गुरुआज्ञे निवास । आपणची ॥ जो गुरुकुळे सुकुलीन । जो गुरुबंधुसौजन्ये सुजन । जो गुरुसेवाव्यसने सव्यसन । निरंतर ॥ गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचे गा ॥ गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माता गुरु पिता । जो गुरुसेवेपरता । मार्ग नेणे ॥ श्रीगुरुचे द्वार । ते जयाचे सर्वस्व सार। गुरुसेवकां सहोदर- प्रेमें भजे ॥ १ सेवा. २ पंखा. ३ सेवक. ४ ओवाळणी. ५ पुष्ट.