पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६६८ ना तरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं। .. गुरु धेनु आपण पोटीं । वत्स होय ॥ गुरुकृपास्नेहसलिलीं। आपण होय मासोळी। कोणे एके वेळीं । हेचि भावी ॥ गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचे होय रोप । ऐसैसे संकल्प । मनचि विये ॥ चक्षुपक्षेवीण । पिलूं होय आपण । कैसे मैं अपारपण । आवडीचें ॥ गुरूते पक्षिणी करी। चारा घे चांचूवरी। गुरु तारु धरी। आपण कांस ॥ ऐसे प्रेमाचेनि यावें । ध्यानचि ध्यानाते प्रसवे। पूर्णसिंधू हेलावे । फुटती जैसै ॥ किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरीं। भोगी आतां अवधारी । बाह्यसेवा॥ - ज्ञा. १३. ३९६-४ ०३. तरि जिवीं ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसेनि गुरु कौतुकें । माग म्हणती ॥ तैसिया साचा उपास्ती । गोसावी प्रसन्न होती। तेथ मी विनंती। ऐसी करीन ॥ म्हणेन तुमचा देवा । परिवार जो आघवा । येतुले रूपे होआवा । मीचि एक ॥ आणि उपकरती आपुली । उपकरणे आथि जेतुलीं। माझी रूपे तेतुलीं। होआवीं स्वामी ॥ ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु। मग तो परिवारु । मीच होईन ॥ ज्ञा. १३.४०४-४०८. १ वृष्टिः २ तारणारा. ३ बळाने. ह तरंग, लाटा. ५ अवसान बाळगतो.