पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६८ नीतिविचार, ऐसेया गुरुग्रामींचे आलें । कां स्वये गुरूनीचि धाडिले । तरि गतायुष्या जोडले । आयुष्य जैसे ॥...॥... ना तरि रंक निधान देखिले। कां आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आले । इंद्रपद ॥ तैसा गुरुकुळींचेनि नांवे । महासुखे अति थोरावे। . जे कोडे हन पोटाळावे । आकाश कां ॥ मैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी। जाण शान तयापासीं। पाईकी करी ॥ ज्ञाः १३. ३६९-३८४. आणि आभ्यंतरिलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरुचे रूपडें । उपासी ध्यानीं ॥ हृदयशुद्धीचिया आवोरी । आराध्य तो निश्चळ धुर करी। मग सर्वभावेसी परिवारी । आपण होय ॥ कां चैतन्याचिये पोवळी-। माजि आनंदाचिया राउळीं। श्रीगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥ उदयजितां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्विकां । भरोनियां व्यंबका । लाखोली वाहे ॥ काळशुद्धि त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळी । ज्ञानदीपें वोवाळी । निरंतर ॥ सामरस्याची रसैसोय । अखंड अर्पित जाय। आपण भराडी होय । गुरु तो लिंग ॥ ज्ञा. १३. ३८५-३९०. एकाधिये वेळे । गुरु माय करी भावबळे । मग स्तन्यसुखे लोळे । अंकावरी ॥ १ दरिद्री. २ भिकारी. ३ चाकरी. ४ आंतल्याबाजूस. ५ आवारांत, कुसुवांत. ६ श्रेष्ठ, मोठा. ७ आवारांत. ८ घालतो. ९ परडी, डाळ. १० अष्टसात्विकभावांनी. ११अन्न, स्वयंपाक. १२ पूजारी. १३ देव.